August 9, 2025

आदिशक्ती आदिमाया यशस्विनी;अनिता विश्वनाथ तोडकर

  • लहान वयातच प्रपंचाचा बोजा पेलण्याची जणू सवयच लागली. समाजसेवक विश्वनाथ तोडकर यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर सामाजिक बदलाच्या शिलेदार त्याना लहान वयात व्हावं लागलं. खरंतर सामाजिक काम काय असतं?ते कशासाठी करावं?याची कदाचित त्यांना कल्पनाही नसावी. भरल्या घरातलं जगणं अपेक्षितांच्या सेवेत कधी समर्पित झालं हे त्यांनाही कळलं नसावं. पती सामाजिक कार्य करतात म्हणून त्यांच्या पाठीशी उभा रहावं म्हणून जणू त्यांनी धर्मच स्वीकारला. वयाच्या १९ व्या वर्षी सामाजिक क्षेत्रामध्ये पदार्पण केलं.पती विश्वनाथ आण्णा तोडकर यांच्या कधी सोबत,कधी पडद्यामागे,तर कधी वलसावली म्हणून निरंतर प्रवास सुरू झाला.एका बाजूला लेकरांना सांभाळणं,त्यांचे शिक्षण, आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांना सांभाळनं.नियमित महीणोना महिने, आणि वर्षोना वर्ष थकले,भागले,आले गेले, निवासासाठी आले. ही यात नियमित चालणारी कार्यकर्त्यांची विठ्ठल वारीच म्हणावी लागेल. नियमित चालणारी प्रशिक्षण शिबिरे. खऱ्या अर्थाने दिंडीतील सेवेकरी म्हणूनच त्यांनी असा राबण्याचा वसा घेतला.प्रशिक्षणासाठी आलेल्या कार्यकर्त्यांचं खानं-पिनं,अंथरून- पांघरून आजारपाणी सगळ्या गोष्टींची व्यवस्था करणारी माऊली म्हणून तिने स्वतः पात्र स्वीकारलं. कधी चेहरा पडला नाही.का कधी थकलेली दिसली नाही.ना कधी आजारी. गेली ४० वर्षांमध्ये शेकडो कार्यकर्ते आले गेले.निवासी राहिले पण कोणी उपाशी गेल्याचं कधीच पाहायला मिळालं नाही. त्या कळंबा मध्ये राहत असताना तीस-पस्तीस विधवा,पतित्यकता महिलांना त्यांनी घरी आणलं.त्यांना प्रशिक्षण, निवास,भोजन याची सगळी व्यवस्था करू लागल्या.आलेल्या सर्व महिलांना प्रशिक्षण देऊन शिलाई मशीनचे वाटप केलं.
    मधेच भूकंप झाला.आणि सर्व कळंब तालुक्यातलं बिऱ्हाड चिंचोली रेबे तालुका उमरगा या ठिकाणी आणलं. भूकंपग्रस्ताच्या मदतीला धावायला सुरू केलं.सुख दुखात चालत चालत ज्यांना ज्यांना जे सहज मदत करता येईल त्याना त्याना मदतीच्या स्वरूपात त्यांनी कामाला सुरुवात केली. ३०,४० कार्यकर्ते दोन-तीन वर्ष सोबत होते. सर्वांची आई म्हणूनच ती कार्यरत राहिल्या दोन-तीन वर्षाच्या परिश्रमानंतर भूकंपातलं वातावरण थोडं नॉर्मल झालं. पुन्हा आपला गाढा कळबकडे वळविला. *जिथे पती तिथे मी* हा रिवाज त्यांनी स्वतःला लावून घेतला.पुढे काम वाढत गेलं.दलितांचे प्रश्न, विधवांचे प्रश्न,बालकांचे शिक्षण,त्यांचे हक्क, अधिकार,कर्तव्य. गायरानाचा प्रश्न घेऊन पतीच्या खांद्याला खांदा लावून ती लढत होती.कमी वयामध्ये आलेल्या जास्तीच्या जबाबदाऱ्या पेलन्याचं जनु बळच मिळालं होतं.महाराष्ट्र मध्ये होणारी विविध आंदोलने त्या आंदोलनाच्या सर्व कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम अनिता वहिनीने केलं. सावित्रीमाता फुले यांचा वारसा जणू त्या जपत होत्या.म्हणतात ना *लाखो मेले तरी चालतील परंतु लाखोचा पोशिंदा जगला पाहिजे* या म्हणीप्रमाणे त्यांनी लाखोंना पोसण्याचं काम केलं.म्हणून त्यांना महाराष्ट्र लोकविकास मंचिनी गेल्या वर्षी कर्मयोगी म्हणून संबोधित केलं.त्याना पुरस्कार देऊन सन्मानित केलं.
    सामाजिक बदलाच्या या प्रक्रियेमध्ये पडद्याआड,कधी पडद्यासमोर कधी मोर्चे आंदोलने विविध सामाजिक बदलाच्या कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलं रणरागिणीच्या पात्रात उभे राहून त्यांनी कार्य केलं.
    आज रोजी विचार केला तर दोन हजार विधवां,परित्यक्ता,आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांची आई म्हणून त्या कार्यरत आहेत.अशा या कर्मयोगीला महाराष्ट्र लोकविकास मंच कडून शताब् शतशः प्रणाम…
    (शब्दांकन:- भूमिपुत्र वाघ )
error: Content is protected !!