August 9, 2025

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट सहकार गौरव पुरस्काराने सन्मानित

  • शिर्डी – शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब तालुक्यातील मोहा येथून राज्यात तसेच राज्याबाहेर विविध ठिकाणी नागरिकांत विश्वासाचं व जबाबदारीचे नाते निर्माण करून सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शि.म.ज्ञानदेव मोहेकर मल्टिस्टेटला शिर्डी येथे दि.१२ सप्टेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य मल्टीस्टेट फेडरेशन तर्फे आयोजित सहकार गौरव या कार्यक्रमात मोहेकर मल्टीस्टेटचे चेअरमन हनुमंत मडके यांचा केंद्रीय सहकार सचिव भारत सरकारचे डॉ.आशिष भूतानी यांच्या हस्ते सहकार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
    यावेळी माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख,महाराष्ट्र राज्य मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे,राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे,बुलढाणा अर्बन को ऑप मल्टीस्टेटचे अध्यक्ष राधेश्याम चांडक आदी विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
    याप्रसंगी शि.म.ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेटचे कार्यकारी संचालक विशाल मडके,आय.टी.मॅनेजर प्रमोद मडके,मुख्य लेखापाल इम्रान शेख,प्रशासकीय अधिकारी श्रीकांत मडके,भारत जोशी आदींची व्यवस्थापक उपस्थित होते.
error: Content is protected !!