कळंब ( माधवसिंग राजपूत ) – कळंब बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांच्या भविष्यात होणाऱ्या राजकीय भूमिकेला अनुसरून शहरातील उ.बा.ठा. गटाचे पदाधिकारी यांनी आपल्या पदाची सामुहिक राजीनामे संपर्क प्रमुख व जिल्हा प्रमुख यांच्या कडे पाठवले आहेत, या मुळे उ.बा.ठा.गटाला हाबडा बसणार आहे.शिवाजी कापसे हे तालुका प्रमुख असून,बाजार समितीचे सभापती आहेत.ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता असून, यासाठी १४ सप्टेंबर रोजी मोठे शक्ती प्रदर्शन करीत हजारो कार्यकर्त्यासमवेत हा प्रवेश सोहळा संपन्न होणार आहे.शिवाजी कापसे उस्मानाबाद – कळंब विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. याबाबतची चर्चा गेल्या दोन महिन्यापासून वर्तमानपत्रातून तसेच सोशल मीडियावरून होताना दिसत आहे. त्यांना उमेदवारी येण्याविषयी पक्के आश्वासन मिळाले असल्याने हा पक्षप्रवेश होत आहे.या धर्तीवर सदरील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे या रणनीतीचा एक भाग असल्याचे दिसत असून शिवाजी कापसे यांचा शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश निश्चित झाला आहे हे स्पष्ट होत आहे. शिवाजी कापसे यांच्या निष्ठावंत समजल्या जाणाऱ्या पक्ष पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. या राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्याशिवाय आणखीन काही निष्ठावंत पदाधिकारी यांची नेमकी काय भूमिका आहे हे लवकरच स्पष्ट होईल. शिवसेना उ.ब.ठा.पक्षाकडून विद्यमान आमदार कैलास घाडगे पाटील यांचे उमेदवारी निश्चित मानले जाते. यामुळे व शिवसेनेच्या फुटी नंतर महायुती मधील घटक पक्ष असलेल्या शिंदे शिवसेना पक्षाला उस्मानाबाद- कळंब मतदार संघ निश्चित सुटेल.या परंपरागत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवता येईल हा आडाखा बांधून शिवाजी कापसे यांनी शिवसेना (शिंदे) पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला असल्याचे दिसत आहे. त्यांनी या विषयी आपली भूमिका जाहीर केलेली नाही मात्र गेल्या काही दिवसापासून याविषयी आपले हितचिंतक पक्ष कार्यकर्ते यांच्याशी याविषयी चर्चा करीत असून त्यांचा पाठिंबा घेत असल्याचे समजते. राजिनामा देणाऱ्या मध्ये अजित गुरव,जिलानी कुरेशी, विजय पारवे,राजाभाऊ टोपे, नामदेव पौळ,सतीश टोणगे, शिवाजी कदम,विशाल वाघमारे, सुरेश इंगळे ,जयसिंग चौधरी, विठ्ठल समुद्रे,राजाभाऊ गरड, तात्या माने,बाबुराव गिरी,कैलास खोपकर,भगवान खैरमोडे, अनिल पवार ,सचिन शिंनगारे, सुनील पवार, शंकर खंडागळे, वैभव सुरेश शेळके आदींचा समावेश आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात