कळंब – येथील श्रावणी संजय कोरडे या विद्यार्थिनीने दिव्यांगावर मात करून भारतातील नावजलेल्या बी जे वैद्यकीय मेडिकल कॉलेज मध्ये पहिल्या च फेरीमध्ये प्रवेश मिळविला आहे. श्रावणी चे प्राथमिक शिक्षण जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर कळंब येथे तर पाचवी ते बारावी पर्यंत चे शिक्षण सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंब येथे झाले. तिला बारावी मध्ये उत्तम गुण मिळाले. बारावी नंतर तिने कोणत्याही मोठ्या शहरात न जाता कसल्याही प्रकारची शिकवणी न लावता कळंब येथेच स्वतः अभ्यास केला. नीट ची तयारी करून नीट परिक्षेत घवघवीत यश संपादन केले. नुकताच तिला पुणे येथील नामांकित बी जे वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला आहे. तिच्या यशामध्ये तिचे आई-वडिल,भाऊ,शिवतेज चे संचालक संतोष भांडे, यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. याबद्दल श्रावणी चा मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ.रामकृष्ण लोंढे आणि डॉ.सत्यप्रेम वारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांतर्फ तिच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेण्यात आली व तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ.अशोक शिंपले,डॉ. अभिजित लोंढे,रमेश लोकरे, अप्पासाहेब कस्पटे,अप्पासाहेब वाघमोडे,परमेश्वर वाघमोडे,नानासाहेब कवडे,गट शिक्षण कार्यालयाचे लिपिक बनसोडेउपस्थित होते.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात