August 9, 2025

शिव छत्रपती वाचनालय आणि भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांचा जंगी सत्कार

  • कन्हेरवाडी ( रामराजे जगताप ) – कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथे शिव छत्रपती वाचनालय आणि भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांचा जंगी सत्कार करून सन्मान करण्यात आला. माजी राष्ट्रपती सर्वपल्ली डॉ.राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर रोजी जन्मदिनानिमित्त जि.प.प्रा शाळेच्या प्रांगणात शिक्षकदिन म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वपल्ली डॉ.राधाकृष्णन,छत्रपती शिवाजी महाराज,विश्वेरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले,शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
    यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कल्याण मिटकरी तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.दादाराव गुंडरे उपस्थित होते.निवृत्त शिक्षक संपत जाधव,वसंतराव कवडे,प्रा.डॉ.संजय मिटकरी,विनायकराव शिंदे,गोविंद ईंदे,सुभाष शिंदे,प्रा.मधुकर सावंत,प्रा.नाना जाधव,रमेश कवडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून सन्मान करण्यात आला तसेच ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळा संचलित विद्या विकास हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील पांचाळ,सहशिक्षक माळी संजयकुमार,कुमटे मनोजकुमार,संतोष मोरे,अमरसिंह देशमुख,कोळपे अशोक,पवार सतीश यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून सन्मान करण्यात आला तर जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक नारायण झोरी, सहशिक्षक दिपक चाळक,विरभद्र काटकर,राजेश काळे,परमेश्वर वाघमोडे,श्रीमती मंगल गाढवे,श्रीमती सुषमा हंडिबाग,श्रीमती आशा कंगळे तसेच रामनगर येथील मुख्याध्यापक संतोष काशिद सहशिक्षक सौ.सोनाली जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून सन्मान करण्यात आला. यावेळी प्रस्ताविक भाषांमध्ये प्रा.डॉ.संजय मिटकरी यांनी विद्यार्थ्यांना भौतिक शिक्षण द्या पुस्तके शिक्षण द्या तसेच नैतिकतेचे शिक्षण द्या खरे गुरु जर कोण असेल तर आई असेल शिक्षकांचे काम विद्यार्थी शाळेमध्ये आल्यानंतर भौतिक शिक्षण देणे गरजेचे आहे तसेच पुढे बोलताना आपण कित्येकदा शाळेमध्ये पालक मेळावे घेतले परंतु या मेळाव्याला पालक कमी प्रमाणात येतात जेवढी आई मुलाकडे लक्ष देऊ शकते तेवढे पालक देऊ शकत नाही कारण चौकामध्ये आल्यानंतर सर्व पालक चौकामध्येच असतात घरी लक्ष देणारी फक्त आईच लक्ष देऊ शकते पालकाने या पिढीला घडविणे अत्यंत गरजेचे आहे ही जर पिढी नाही घडवली तर याचा त्रास पालकांनाच होणार आहे. खऱ्या नैतिकतेचे शिक्षण प्राथमिक शाळेतच घडविले जाते म्हणून प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्याचे गरज आहे.
    आज ८० टक्के ग्रामीण भागातील विद्यार्थ्याकडे मोबाईल आहेत त्याचा वापर किती प्रमाणात चांगला होतो किती प्रमाणात नाही हे पालक कोणीही पाहत नाही तसेच शाळेत सोडायला पालक विद्यार्थ्यांना मोटर सायकल वर आणून सोडतात असे मोठेपणा करू नये मुलांना करीत जाणीव करून द्या मुलांना काही गोष्टीची जाणीव होणे अत्यंत गरजेचे आहे असे त्यांच्या मार्गदर्शनातून सांगितले तसेच सरपंच ॲड.रामराजे जाधव यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्या शाळेची परंपरा उज्वल आहे सलग मागच्या १६ ते १७ वर्षापासून विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचा सत्कार व सन्मान करणे आवश्यक आहे म्हणून शिवछत्रपती वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष निवृत्ती जगताप हे करतात पुढे बोलताना म्हणाले की, आपल्या ग्रंथालयातील स्पर्धा व इतर ग्रंथाचे वाचन करून आपल्या गावातील काही विद्यार्थी आज खूप खूप मोठ्या पदावर पोहोचले आहेत तर आप्पासाहेब मिटकरी यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी सरपंच ॲड.रामराजे जाधव, उपसरपंच विजय कवडे,तंटामुक्ती अध्यक्ष कपिल कवडे,चेअरमन चंद्रकांत जाधव,माजी चेअरमन माणिकराव मिटकरी, ॲड.लालासाहे कवडे,निवृत्ती जगताप,माजी सरपंच वसुदेव सावंत,ग्रा.प सदस्य सौ.वर्षा मिटकरी,विद्या मिटकरी,रामभाऊ कवडे,प्रा.विलास जगताप,विवेकानंद मिटकरी सर,निवृत्त मेजर अनंत कवडे, धर्मराज कवडे,प्रा.बाबुराव कवडे,विठ्ठल धोंगडे,श्रीकांत मिटकरी,विक्रम विजयराव कवडे,विजयकुमार कवडे,दत्तात्रय शिंदे ग्रंथालय कर्मचारी व भजनी मंडळ यांच्यासह दोन्ही शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुत्रसंचलन प्रा.विलास जगताप यांनी तर आभार विवेकानंद मिटकरी यांनी मानले.
error: Content is protected !!