August 9, 2025

रोटरीच्या वतीने शहरातील ३५० शिक्षकांना पुष्पगुच्छ आणि लेखणी देऊन शिक्षक दिन साजरा

  • कळंब – ०५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शहरातील ३५० शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी मार्फत देण्यात आल्या. गुरु आणि शिष्याचे नाते सर्वात पवित्र मानले जाते. आपल्या विद्यार्थ्याच्या ध्येयपूर्तीसाठी शिक्षक हा आपले आयुष्य खर्ची घालत असतो. कोणत्याही क्षेत्रात आपल्या विद्यार्थ्याने मिळवलेले यश हे गुरु साठी अभिमानास्पद असते.अशा सर्व गुरुवर्यांचा यथोचित सत्कार करण्याचे काम रोटरी मार्फत दरवर्षी न चुकता गेले जाते. यावर्षीही संपूर्ण रोटरी टीम च्या वतीने कळंब शहरातील सर्वच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रत्येक शिक्षकाला पुष्पगुच्छ आणि लेखणी देऊन शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

  • शहरातील विविध १७ शाळा आणि २ महाविद्यालये मिळून एकूण ३५० शिक्षकांना यावेळी सन्मानित करण्यात आले आणि हे शिक्षक करत असलेल्या पवित्र ज्ञानदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीचे अध्यक्ष शिंदे, सचिव अशोक काटे, प्रोजेक्ट चेअरमन लक्ष्मीकांत भुतडा, संकेत जाजू आणि सर्व रोटरी सदस्यांनी मेहनत घेतली.

error: Content is protected !!