August 9, 2025

इटकूर येथे बाजार समितीची उपबाजार स्थापन होणार

  • इटकूर – कळंब कृषी उत्पन्न बाजारची उपबाजार ईटकुर येथे सुरू करण्या करीता मागील काही वर्षापासून हालचाली सुरू होत्या.बाजार सम‍ितीला ईटकुर येथील विठ्ठल रूक्म‍िणी देवस्थानची जागा बाजार सम‍ितीने मागणी केली होती. देवस्थानच्या जागे बाबत देवस्थानच्या ट्रस्ट कम‍िटीमध्ये या बाबत व‍िचारणा करण्यात आली होती सदर व‍िषया बाबत द‍ि.५-९-२०२४ रोजी ईटकुर येथे बैठक संपन्न झाली.
    सदर बैठकीला कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे,विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अरूण बावळे, देवस्थान ट्रस्टचे सचिव बबन क्षीरसागर,ट्रष्ट संचालक जगन्नाथ कदम, जिल्हा परिषद माजी कृषी सभापती प्रताप पाटील,संचालक अनंत लंगडे, भारत नाना सांगळे ईटकुरचे उपसरपंच विलास गाडे,कळंब पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा ग्रा.प.सदस्य लक्ष्मण आडसुळ, कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दत्तात्रय वाघ,माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी आडसुळ,माजी सरपंच अभिमान आडसुळ,विजय माने, भारत जाधव,पवन आडसुळ, ग्रा.प.सदस्य गुंडेराव गंभीरे बाळासाहेब गंभीरे,श्रीकांत गंभीरे,अमरसिंह आडसुळ, निखिल गंभीरे,तात्या गंभीरे, सचिन गंभीरे,व्यापारी सुंदर आडसुळ,अमरसिंह आडसुळ, बाबु सालपे व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. बैठकीत ईटकुर येथे विठ्ठल रखुमाई ट्रस्ट ने अटी शर्ती घालून वरीष्ठ कार्यालयाच्या मंजूरीने कळंब बाजार सम‍ितीची उपबाजार समिती स्थापन करण्या करीता निश्चित झाले आहे.बाजार सम‍िती सुरू झाल्यास सदर उपबाजारास ट्रस्ट चे नाव, गावातील तरुनांना प्राधान्य, वार्षीक भाडे, २ लक्ष रूपये अशा अनेक अटी शर्ती नुसार जागा उपलब्ध करून देण्याची ट्रस्ट कमेटी यांनी कबुल केले आहे. लवकरच ट्रस्ट चा ठराव घेवून पुढील कामकाजास सुरूवात होणार आहे.असे यावेळी सुचव‍िले सभापती यांनी पुढाकार घेतल्याने गावकऱ्यांनी ट्रस्ट व सभापती यांचे आभार मानले.
error: Content is protected !!