August 9, 2025

ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने लता मंगेशकर विद्यालयातील शिक्षकांचा सत्कार

  • कळंब – ५ सप्टेंबर भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक हे भावी पिढीचे शिल्पकार आहेत ते मुलांना ज्ञान, व संस्काराच्या माध्यमातून जीवनाला आकार देण्याच काम करतात शिक्षक दिनी शिक्षकांच्या कार्याचा गौरव व सन्मान व्हावा यासाठी सत्कार केला जातो शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय विद्यालयासाठी गुणवत्ता यादीत अधिक संख्येने विद्यार्थी असलेल्या लता मंगेशकर विद्यालयातील शिक्षकांचा ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ यांच्या हस्ते मुख्याध्यापक विक्रम दळवे, सहशिक्षक बोधिसत्व वाघमारे, सिद्धेश्वर कोठावळे,विजय वरपे, गजानन पाटील ,महेश पस्तापुरे, नारायण बाकले ( नगरपरिषद शाळा क्रमांक १ ) श्रीमती शीला चौरे,श्रीमती सरोजा आगरकर, लता मंगेशकर विद्यालय कळंब यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व पालक अॕड,मनोज चोंदे,दत्ता गायकवाड ,माधवसिंग राजपूत ,संदीप कोकाटे, राजकुमार अडसूळ,अनिकेत कोकाटे यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!