August 9, 2025

आश्रुबा कोठावळे यांना उपक्रमशील शिक्षक पुरस्कार प्रदान

  • कळंब – दि.५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर कार्यालय धाराशिव येथे पवनराजे फाउंडेशन वतीने देण्यात येणारा उपpक्रमशील शिक्षक सन्मान पुरस्कार २०२४ आश्रुबा अंकुश कोठावळे, संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालय कळंब येथील विशेष शिक्षक मुकबधीर मुलांना अध्यापन करण्याचं कार्य करतात यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
    कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कळंब – धाराशीव मतदार संघाचे आमदार कैलास घाडगे पाटील उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मकरंद राजेनिंबाळकर, शिक्षक नेते बाळकृष्ण तांबारे, विक्रम पाटील यांच्या शुभहस्ते आश्रुबा कोठावळे यांना उपक्रमशील शिक्षक पुरस्कार देण्यात आला.
    शिक्षण क्षेत्रातील विविध उपक्रम,उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण सात शिक्षकांना सन्मानपत्र, ट्रॉफी, शाल, लोकसभेत मराठवाडा हे पुस्तक देऊन गौरव करण्यात आले.
    लोकनेते कै.पवनराजे उर्फ भोपालसिंह संताजीराव राजेनिंबाळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गणेश शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खासदार कार्यालयाचे कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.
error: Content is protected !!