कळंब ( माधवसिंग राजपूत )- महाराष्ट्र राज्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दिनांक 3 सप्टेंबर पासून आपल्या प्रलंबित विविध मागण्यासाठी कामबंद आंदोलन सुरू केली असून. 4 सप्टेंबर दुसऱ्या दिवशीही कळंब बस आगारातील कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू ठेवले होते रात्री कर्मचारी संघटनेच्या नेत्या बरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली व या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनात 6500 रुपये वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली यानंतर कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला व मूळ पगारात केलेल्या वाढीचे स्वागत केले आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ यांनी कर्मचारी कामबंद आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला राज्य सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्या प्रमाणे रात्रंदिवस रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार का ? मिळत नाही मात्र आमदार खासदार आपले वेतन भत्ते विना चर्चा वाढवून घेतात याकडे लक्ष वेधले तर माधवसिंग राजपूत यांनी याप्रसंगी कामबंद आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व वेळोवेळी दिलेली आश्वासने सरकारने पूर्ण करावीत अशी मागणी केली तर एसटी कामगार संघटनेचे नेते कल्याण कुंभार यांनी सरकारने मागील आंदोलनाच्या वेळी दिलेली आश्वासने पूर्ण करावीत प्रत्येक चार वर्षासाठी सरकार करार करते या कराराची अंमलबजावणी होत नाही, सातव्या वेतन आयोगाची मागणी आहे यासाठी अडचणी सांगितल्या जातात , परंतु प्रलंबित मागणी 2016 प्रमाणे मूळ पगार वाढवावा , राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावे ,राज्य सरकारचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी व एसटी महामंडळातील कर्मचारी यांच्या पगारात मोठी तफावत आहे याकडे लक्ष वेधले, तसेच 2018 पासून 2024 पर्यंतचा डीए चा फरक दिलेला नाही तो शिल्लक आहे तो तात्काळ मिळाला पाहिजे अशी मागणी केली न्याय हक्कासाठी ,लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार मिळाला आहे या आंदोलनात एसटी कर्मचारी संघटना, कामगार सेना, तसेच कास्ट ट्राईब संघटना यांच्यासह 14 संघटनां यांचा सहभाग असून 95% कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत असे सांगितले या आंदोलनात कल्याण कुंभार, सायस खराटे ,महेश थोरबोले, आबासाहेब चौधरी, सुबोध रणदिवे ,उमाकांत गायकवाड, अनिल बांगर यांच्यासह चालक ,वाहक व यांत्रिकी कर्मचारी यांचा सहभाग आहे दोन दिवसापासून या आंदोलनामुळे एसटीची प्रवासी सेवा विस्कळीत झाली आहे, यामुळे प्रवाशांना जास्तीचे प्रवासी भाडे देऊन खाजगी वाहनाद्वारे प्रवास करावा लागत असून ग्रामीण भागातून शाळा, महाविद्यालयासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच कार्यालयीन कामकाज व बाजारपेठेतील खरेदी-विक्री व्यवहारासाठी येणारे प्रवासी, वृद्ध नागरीक यांना जागोजागी खाजगी प्रवासी वाहनाची वाट बघत थांबावे लागले गौरी, गणपती सण, उत्सव असल्याने या संपात तोडगा निघावा व संप लवकर मिटावा अशी मागणी प्रवाशातून होत होती.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात