August 9, 2025

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्या – डॉ.प्रतापसिंग पाटील

  • धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात ३० ऑगस्ट पासुन अतिवृष्टी व सततचा पाऊस झाल्याने जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तात्काळ पंचनामे करुन धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार,मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांच्याकडे केली आहे.
    पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून मागील तीन दिवसात एकूण सलग ३८ तास पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यातील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.तरी तात्काळ पंचनामे करुन धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांच्या नुकसानीची भरपाई करावी असेही या निवेदनात पुढे म्हटले आहे.
error: Content is protected !!