कळंब – केंद्र शासनाने 2024-25 करिता सोयाबीन या शेतमालाचे हमीभाव प्रतिक्विंटल 4892 रु. निश्चित केले आहे.परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना सध्या सरासरी 3800 ते 4000 रु.भाव मिळत आहे. म्हणजेच सोयाबिनच्या हमीभावापेक्षा सरासरी एक हजार रुपयांनी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. आता येत्या हंगामाचे नविन सोयाबीन 15 सप्टेंबरपासून बाजारात विक्रीसाठी येणे सुरू होईल. पैशाच्या अडचणीमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन विक्रीसाठी गर्दी करतील व अशातच शासनाने मोठ्या प्रमाणावर खाद्य तेलाची आयात केल्याची वार्ता असल्याने नविन सोयाबीनचे दर अधिकच घसरुन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. इतर पिके यांची जोपासना करण्यासाठी, तसेच दसरा व दिवाळीचे आर्थिक नियोजन करण्यासाठी सोयाबीन विकण्याशिवाय शेतकऱ्यांजवळ दुसरा पर्याय नाही. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन नोंदणीसाठी लागणारे दस्तावेज व त्यादृष्टीने लागणारा कालावधी लक्षात घेऊन आतापासूनच नोंदणी प्रक्रिया सुरु करुन 15 सप्टेंबरपूर्वी ती पूर्ण करावी व केंद्र शासनाने 15 सप्टेंबरपासून हमीदराने सोयाबीन खरेदी सुरू करावी,अशी आग्रही मागणी सभापती शिवाजी दिगांबर कापसे यांनी जिल्हा मार्केटींग अधिकरी यांना केली आहे. बाजार समितीच्या कायद्यामध्ये असलेली तरतूद लक्षात घेऊन बाजार समिती सभापती शिवाजी दिगांबर कापसे यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना सोयाबीन हमीदराने खरेदी करण्याकरिता बाजार समितीला अधिकार द्यावे तसेच नविन खरेदी केंद्र सुरु करण्याकरीता ची कार्यवाही तात्काळ सुरू करण्या बाबत पत्र दिले आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले