August 9, 2025

श्री विठ्ठल भगवंत मंदिर येथे गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात संपन्न

  • कळंब (माधवसिंग राजपूत ) – श्री विठ्ठल श्री भगवंत मंदिर येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव”गोकुळाष्टमी” मोठ्या थाटात व उत्साहात साजरा करण्यात आला.
    यानिमित्त आयोजित सप्ताहात विविध कार्यक्रमाचे २१/०८/२०२४ वार बुधवार ते २८/०८/२०२४ बुधवार आयोजन करण्यात आले आहे.

  • प्रसिद्ध भागवत कथाकार ह.भ.प.भालचंद्र महाराज देव यांनी आपल्या अमृत वाणीतून श्रीमद् भागवत कथा सांगितली. त्यांना तबला साथ पद्मनाभदेव, हार्मोनियम गंगाधर देव हे करीत आहेत.त्यांनी दिनांक २६ ऑगस्ट सोमवार रोजी श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह सोहळा प्रसंग सांगितला. चिमुकल्या बालकांनी श्रीकृष्ण- रुक्मिणी वेश परिधान केला होता.याप्रसंगी अक्षदा म्हणून पुष्पवृष्टी करण्यात आली. याप्रसंगी कळंब नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक गोपाल तापडिया,सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक माधवसिंग राजपूत यांचा भगवंताचा फोटो,श्रीफळ व पुष्पहार देऊन भागवत कथाकार ह.भ.प .भालचंद्र महाराज देव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात ज्ञानेश्वरी प्रमुख वाचक म्हणून ह.भ.प.श्री व सौ.निर्मलाताई जयंतराव ईटकुरकर सहभागी आहेत. किर्तन सेवा ह.भ.प. प्रसाद महाराज सहस्रबुद्धे बार्शी, मंगेश महाराज हिवरेकर जालना, श्रीराम बुवा रामदासी लातूर ,संगीत भजन रोशन दीक्षित दिनांक २६ ऑगस्ट गोकुळाष्टमी निमित्त श्री ची महापूजा श्रीकांत हुलसुलकर यांनी केली.

  • श्री चा जन्मउत्सव रात्री बारा वाजता मोठ्या भक्ती भावाने संपन्न झाला.२७ ऑगस्ट मंगळवार रोजी श्री भगवंत पालखी नगरप्रदक्षिणा सकाळी १० ते १२ या वेळेत संपन्न झाली. मिरवणुकीत मंगल कलश डोक्यावर घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या. दिनांक २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प.नारायण महाराज उत्तरेश्वर पिंप्रीकर यांचे काल्याचे किर्तन होईल व श्रीकांत हुलसुलकर यांच्या वतीने महाप्रसाद पंगत होईल वरील सर्व कार्यक्रम दक्षिण मुखी हनुमान भजनी मंडळ यांच्या मार्गदर्शनात संपन्न होत आहेत.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजक जिवनराव महाराज रत्नपारखी वंशपरंपरागत निवासी पुजारी/मुख्य व्यवस्थापक विठ्ठल भगवंत मंदिर संस्थान कळंब जयंतराव कुलकर्णी,सुरेश कल्याणकर,श्रीकांतराव हुलसुलकर,विलास मिटकरी, प्रकाशराव मोरे,डी.के.कुलकर्णी, श्रीकांत लोहटेकर,विष्णुपंत ठोंबरे,विजय मोहिते ,पांडुरंग माळवदे,काका चोंदे,चंद्रशेखर बारटक्के,ज्ञानेश्वर बारटक्के,बारटक्के,भाग्येश रत्नपारखी,परिमाळा घुले, नंदाबाई पांचाळ हे परिश्रम घेत आहेत.

error: Content is protected !!