धाराशिव- जिल्ह्यातील लोहारा तालुका येथील मौजे धानोरी येथील कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी अनुसूचित जाती केंद्रीय आयोग दिल्ली यांनी मंजूर केलेले व समाज कल्याण सहाय्यक आयुक्त धाराशिव यांनी पंचनामा केलेले घर हे राधिका लखन गवळी यांच्या ताब्यात तात्काळ देण्यात यावे अन्यथा ९ सप्टेंबर पासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा पिडित कुटुंबाने दिला आहे. जिल्हा प्रशासनाकडे अनेक वेळा मोर्चे व आंदोलन करण्यात आले निवेदन देण्यात आले मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही. मौजे धानोरी तालुका लोहारा जिल्हा धाराशिव येथे चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रकार घडला असून आरोपीच्या विरोधात लोहारा पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कायद्यानुसार व अनुसूचित जाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीचे नातेवाईक नोंदवलेला गुन्हा माघारी घेण्यासाठी वारंवार जीवे मारण्याची धमकी देत आहेत व घरात घुसून जातीवाचक शिवीगाळ लावा बुक्क्यांनी मारहाण करत असल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.हा सातत्याने मानसिक व आर्थिक त्रास देत आहेत व गाव सोडून जाण्यास भाग पाडत असल्यामुळे मी माननीय जिल्हाधिकारी साहेब धाराशिव समाज कल्याण सहाय्यक आयुक्त धाराशिव समाज कल्याण आयुक्त पुणे यांच्याकडे माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे त्यामुळे माझ्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी केली असता मला संबंधित अधिकाऱ्याकडून न्याय मिळाला नाही म्हणून मी स्वतःअनुसूचित जाती केंद्रीय आयोग दिल्ली यांच्याकडे तक्रार दिल्यामुळे दिनांक २६-१०-२०२३ रोजी दिल्ली येथे सुनावणी ठेवण्यात आली. राधिका लखन गवळी यांचे पुनर्वसन मंजूर करून तात्काळ त्यांच्या ताब्यात देण्यात यावे असे आदेश देण्यात आले होते परंतु जवळपास एक वर्ष होऊन सुद्धा पीडित कुटुंबाला न्याय मिळत नाही व मंजूर असलेले पुनर्वसन घर ताब्यात दिलेले नाही म्हणून आम्ही पीडित कुटुंबासह दि.०९-०९-२०२४ रोजी पासून जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव समोर आमचे मंजूर असलेले घर आमच्या ताब्यात येईपर्यंत आमरण उपोषण करणार आहोत व उपोषण दरम्यान जे काय परिस्थिती निर्माण होईल त्यास सर्वस्व शासन प्रशासन जबाबदार असेल. असे निवेदनात नमूद केले आहे. फकीरा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष श्रीरंग सरवदे,नागीन थोरात,मिराबाई गवळी,तातेराव गवळी,राधिका गवळी,लखन गवळी,लक्ष्मण खंडागळे,सुरेखा गायकवाड यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी