August 9, 2025

पोलिओचा संशयित आढळल्यास नागरीकांनी घाबरुन जाऊ नये – आरोग्य विभागाचे आवाहन

  • धाराशिव (जिमाका) – तालुक्यात भिकारसारोळा या गावामध्ये पोलिओचा संशयित आढळला अशाप्रकारचे वृत्त काही वृत्तपत्रात प्रकाशित झाले आहे.खरच आता पोलिओचा आजार पुन्हा आला की काय अशी भीती सर्वसामान्यामध्ये निर्माण झाली.
    तरी नागरिकांनी याबाबत कसलाही संभ्रम बाळगण्याची आवश्यकता नाही.कारण ही बाब म्हणजे नियमित सर्वेक्षणाचा भाग आहे.वास्तविक देशातून पोलिओच्या आजाराचे निर्मूलन झाले आहे.सन 2011 नंतर भारतात पोलिओ वाईल्ड विषाणूचा एकही रुग्ण आढळलेला नाही.हे साध्य करण्यामध्ये पोलिओचे लसीकरण व पोलिओ संशयित बाबतचे सर्वेक्षण या दोन महत्वाच्या बाबीची प्रमुख भूमिका आहे.सर्वेक्षण व लसीकरण हा नियमित कार्यक्रमाचा भाग असून तो पोलिओ व्यतिरिक्त गोवर,रुबेला,घटसर्प,डांग्याखोकला व नवजात शिशुमधील धनुर्वात या आजारासाठी देखील करण्यात येतात.
    हे सर्वेक्षण सतत करण्यात येऊन एखादा संशयित आढळल्यास त्याची प्रयोगशाळा तपासण्या करण्यात येतात.पोलिओच्या नियमित सर्वेक्षणामध्ये पंधरा वर्षाच्या आतील बालकांमध्ये कोणत्याही कारणामुळे अचानक लुळेपणा आला असल्यास त्यास Acute Flaccid Paralysis असे संभोधले जाते व अशा रुग्णाच्या शौचाचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला जातो.असे रुग्ण शासकीय व खाजगी आरोग्य यंत्रनेमार्फत शोधणे व त्याचा तपास करणे हा नियमित सर्वेक्षणाचाच भाग आहे.असे रुग्ण दरवर्षी आढळत असतात.चालू वर्षी देखील जुलै 2024 अखेर असे 13 रुग्ण आढळून आले असून त्यांचा तपासणी निष्कर्ष प्राप्त झाल्यावर त्यांच्यापैकी एकातही पोलिओचा विषाणू आढळलेला नाही.
  • एखाद्या आजाराचे निर्मूलन अबाधित ठेवण्यासाठी त्याचे सर्वेक्षण नियमित करणे आवश्यक आहे.असे संशयित शोधणे हा त्या सर्वेक्षणाचा नियमित भाग असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.
error: Content is protected !!