कळंब – मागासवर्गीय सेवा निवृत्त कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष अरुण बनसोडे, सचिव अँड. सुदेश माळाळे व कार्याध्यक्ष अशोक बनसोडे यांच्या उपस्थितीत लुम्बिनी बुध्द विहार यशवंत नगर कळंब येथे दि.२८/०७/२०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत कळंब तालुक्यातील खालील कार्यकारणी निवड करण्यात आली. अध्यक्षपदी प्रा.तात्याराव वाघमारे,सचिवपदी – सुरेंद्र शिलवंत, उपाध्यक्ष मधुकर सावंत,कार्याध्यक्ष मारुती गायकवाड,सल्लागार सी.आर घाडगे,कोषाध्यक्ष अरुण लोंढे,संघटक डी.टी. वाघमारे.
या प्रसंगी दिलीप वाघमारे, दयानंद सोनवणे, सुनिल गाडे, श्रीधर सावंत,महादेव गाडे हे उपस्थित होते.तालुक्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे शासकीय/कौटुंबिक व सामाजिक प्रश्नावर हा संघ काम करणार आहे. या संघटनेचे प्रदेशध्यक्ष लातुर येथील प्रा.अनंत लांडगे हे आहेत.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड