August 9, 2025

शांतता रॅली काढून महिला डॉक्टरांनी केला निषेध

  • कळंब (महेश फाटक ) – कोलकाता येथील राधा गोविंद कार वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटल मध्ये दि ९ ऑगस्ट रोजी महिला डॉक्टर मौमिता देबनाथ यांचे वर पाशवी बलात्कार करून त्यांची अमानुष हत्या करण्यात आली. सदरील निंदनीय घटनेमुळे संपूर्ण देश व जगभरात हळहळ व्यक्त केली जात असून चौहोकडे संतापाची लाट पसरली आहे. या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन ने शनिवार दि.१७ ऑगस्ट २०२४ रोजी संपूर्ण देशात शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त करून वैद्यकीय सेवा बंद ची हाक दिली होती. याचाच एक भाग म्हणून कळंब येथील सर्व डॉक्टर्स, ईनरव्हील क्लब, औषधी विक्रेता संघ, रेणुका नर्सिंग कॉलेज, महिला अत्याचार विरोधी संघटना, महिला शिक्षक संघ, सामाजिक महिला कार्यकर्ते ई च्या वतीने शांतता रॅली चे आयोजन केले होते. येथील उपजिल्हा रूग्णालय पासुन रॅली ला सुरूवात झाली. प्रथम अत्याचारास बळी पडलेल्या महिला डॉक्टरांना भावपूर्ण श्रृदांजली अर्पण करण्यात आली.
    रॅली विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक पर्यंत जाऊन परत त्याच मार्ग उपजिल्हा रूग्णालय मध्ये येऊन समारोप करण्यात आला. या वेळी विविध मान्यवरांनी विचार मांडले. यावेळी डॉक्टर्स व दवाखाने संरक्षण कायदा केंद्राने त्वरित पारित करून त्याची प्रभावी पणे अमलबजावणी करावी जेणेकरून अशाप्रकारच्या घटनांना आळा बसेल.
    या शांतता रॅली मध्ये जवळपास ३०० पेक्षा जास्त डॉक्टर्स व इतर संघटनेचे सदस्य सहभागी झाले होते. या मध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती हे विषेश. आशा प्रकारची रॅली कळंब येथे पहिल्यांदा च आयोजित करून ती शांततेत पार पाडली गेली .
    शांतता रॅली च्या यशस्वीतेसाठी आय एम ए चे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ.रामकृष्ण लोंढे,कळंब शाखाध्यक्षा डॉ.शितल कुंकुलोळ, सचिव डॉ.सत्यप्रेम वारे, डॉ. शिल्पा ढेंगळे, केटीएमपीए अध्यक्ष डॉ. राजेंद्र गोरे. सचिव डॉ. अभय मनगीरे, ईनरव्हील क्लब अध्यक्षा डॉ.प्रतिभा भवर,सचिव डॉ.प्रियंका आडमुठे,औषध विक्रेता संघाचे शहराध्यक्ष निखिल भडंगे, तालुका अध्यक्ष प्रमोद पोते, जिल्हा उपाध्यक्ष किरण चव्हाण,निलेश घोडके,फहाद चाऊस. रेणुका नर्सिंग कॉलेज चे स्टाप,विद्यार्थी, सावित्रीबाई फुले प्रशालेच्या डॉ.मिनाक्षी भवर व त्यांचा स्टाफ, विविध हॉस्पिटल चा स्टाफ, सामाजिक सक्रिय कार्यकर्त्या ज्योतीताई सपाटे, डॉ. वर्षा कस्तुरकर, डॉ.शोभा पाटील,डॉ.दिपाली लोंढे, वैदेही लोंढे, डॉ.आकांक्षा पाटील, डॉ. अमित पाटील,डॉ.अरुणा गावडे, डॉ.गोवर्धन तांबारे, डॉ. रमाकांत कल्याणकर, डॉ.प्रशांत काकडे, डॉ.राजेंद्र बावळे , डॉ.महादेव कोरसळे, डॉ. सुधीर आवटे, डॉ. अभिजित लोंढे,डॉ. वाकुरे, डॉ. दिपक कुंकुलोळ,डॉ महेश रपकाळ, डॉ.भवर, डॉ.बिदादा, डॉ. महाकुंडे आदीनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!