कळंब – शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन क्रीडा संकुल कळंब या ठिकाणी दि.१७ ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात आले होते. या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये अनेक शाळांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेत कै.भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालय भाट शिरपुरा तालुका कळंब या शाळेच्या १४ वर्ष मुलीच्या संघाची जिल्हास्तरावर निवड झाली. खेळामध्ये सहभागी खेळाडू सोनाक्षी शिंदे,कल्याणी खापे, सृष्टी वाघमारे ,सामिया शेख ,आर्या कदम,पूजा मस्के,प्रियंका खापे,वैष्णवी गायकवाड ,अनुष्का झोंबाडे या सर्व खेळाडूंनी यशस्वी कामगिरी बजावली. या सर्व खेळाडूंना मार्गदर्शन बालाजी ओव्हाळ व जि .प .प्रा. शाळा भाट शिरपुरा येथील क्रीडा शिक्षक राजाभाऊ शिंदे यांनी केले व पुढील वाटचालीसाठी संस्थेचे सचिव बाळकृष्ण धस, शाळेचे मुख्याध्यापक सुरेश टेकाळे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व खेळाडूचे अभिनंदन करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व सर्वांनी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले