August 9, 2025

वेद शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

  • कळंब (विशाल पवार ) – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने व प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
    यावेळी भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
    याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख प्रा.श्रीकांत पवार,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके, प्रा.मोहिनी शिंदे,भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरज भांडे,निदेशक अविनाश म्हैत्रे,निदेशक राजकुमार शिंदे,निदेशक सचिन राऊत,निदेशिका कोमल मगर,आदित्य गायकवाड, विनोद कसबे,सोनाली ढमाले व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!