धाराशिव (जिमाका) – शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, नाशिक मर्या.,यांच्यामार्फत आदिवासी समाजातील युवक युवतींना स्वयंरोजगार मिळावा यासाठी अल्प व्याजदराने एन.एस.टी.एफ.डी.सी. नवी दिल्ली पुरस्कृत योजनेतंर्गत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. सन २०२४-२५ करीता लक्षांक प्राप्त झाला असून धाराशिव जिल्हयातील आदिवासी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे शाखा व्यवस्थापक रा.भ.पाटील यांनी केले आहे. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत एन.एस.टी.एफ.डी. सी.नवी दिल्लीच्या धर्तीवर राज्य शासनामार्फत स्वयंरोजगाराच्या कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ शाखा कार्यालय,जुन्नर कार्यक्षेत्रात येणारे सर्व जिल्हयामधील आदिवासी लाभार्थ्याकरिता कर्ज योजना राबविण्यासाठी खालील तपशिलाप्रमाणे सन २०२४-२५ साठी योजनानिहाय लक्षांक प्राप्त झालेले आहे.यामध्ये महिला सबलीकरण योजनेसाठी २ लाख याप्रमाणे २२ प्रस्ताव,कृषी आणि कृषी संलग्न व्यवसाय ५ लक्ष याप्रमाणे ६ प्रस्ताव, हॉटेल ढाबा व्यवसायासाठी ५ लक्ष याप्रमाणे ६ प्रस्ताव,ऑटो वर्क शॉप/स्पेअर पार्ट व्यवसायासाठी ५ लक्ष याप्रमाणे ६ प्रस्ताव,वाहन व्यवसायासाठी १० लाख याप्रमाणे ५ प्रस्ताव,वाहन व्यवसायासाठी १० लाखापेक्षा जास्त व रुपये १५ लाखापर्यंत याप्रमाणे ८ प्रस्ताव,लघु उद्योग व्यवसायासाठी ३ लाखापर्यंत ७ प्रस्ताव,ऑटो रिक्षा/ मालवाहू रिक्षा व्यवसायासाठी ३ लाख याप्रमाणे ६ तर स्वयंसहाय्यता बचतगटासाठी ७ प्रकरणांचे लक्षांक प्राप्त झाला आहे. तरी जिल्हयामधील आदिवासी समाजातील इच्छुक उमेदवारांनी www .mahashabari.in या संकेतस्थळाच्या माध्यामातुन १५ सप्टेंबरपर्यंतऑनलाईन कर्ज फॉर्म भरण्याचे आवाहन शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ जुन्नर शाखा कार्यालयाचे शाखा व्यवस्थापक रा.भ.पाटील यांनी केले आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी