August 9, 2025

मोहेकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा

कळंब -शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शि. म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय युवा दिन १२ ऑगस्ट निमित्ताने नशा मुक्त भारत अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. तसेच उपजिल्हा रुग्णालय कळंब व रेड रिबीन क्लब आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांची एचआयव्ही रक्त तपासणी करण्यात आले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार,उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान,उपप्राचार्य आप्पासाहेब मिटकरी,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.संदीप महाजन,प्रा.डॉ.राठोड ईश्वर,डॉ.मीनाक्षी जाधव,प्रा.डॉ. वर्षा सरवदे, प्रा. ज्योती टिप्परसे,प्रा. डॉ.नामानंद साठे, प्रा.देवकते संदीप,प्रा.आडे,प्रा. डॉ.दीपक सूर्यवंशी,प्रा.तांबोळी, प्रा.सुरज गपाट,सहाय्यक ग्रंथपाल अरविंद शिंदे,कार्यालय अध्यक्ष हनुमंत जाधव,लक्ष्मण हाके,चांगदेव खंदारे यासोबतच उपजिल्हा रुग्णालय कळंब मधील – आय सी टी सी समुपदेशक परशुराम कोळी,प्रगती भंडारी ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ ईश्वर भोसले व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!