August 9, 2025

कळंब येथील सावित्रीबाई फुले उच्च व माध्यमिक विद्यालयात बालहक्क जनजागृती कार्यक्रम

  • धाराशिव (जिमाका) – कळंब येथील सवित्रीबाई फुले उच्च व माध्यमिक विद्यालयात नुकतेच बालहक्कविषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी बालहक्क व मुलांच्या समस्या यावर चर्चा करण्यात आली.यावेळी बालविवाहाविषयी माहिती देण्यात आली.बालकासंबंधीच्या विविध योजनांचे आणि चाइल्ड हेल्प लाईन १०९८ ची माहितीही देण्यात आली.
    चाइल्ड हेल्प लाईनचे सूपरवायझर अमर भोसले,पल्लवी प्रशाळेचे मुख्याध्यापक पठाण यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.चाइल्ड हेल्प लाईन १0९८ जनजागृती उपक्रम प्रभारी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी ए.बी.कांबळे,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ए.बी.कोवे व चाइल्ड हेल्प लाईन १0९८ चे प्रकल्प समन्वयक व्ही.पी.चव्हाण यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाला.
error: Content is protected !!