कळंब – दि २५ सप्टेंबर २०२३ ते २६ सप्टेंबर २०२३ रोजी धाराशिव येथे झालेल्या जिल्हास्तरीय रग्बी या खेळात मुलींच्या संघाने प्रथम येण्याचा मान दि २७ सप्टेंबर २०२३ रोजी कळंब येथे झालेल्या आट्यापाट्या या स्पर्धेत मुलींचा संघ जिल्हास्तरावर प्रथम येण्याचा मान मिळवला. दि.०४ ऑक्टोंबर २०२३ रोजी शालेय कबड्डी स्पर्धेत जिल्हास्तरीय मुलींचा प्रथम येण्याचा मान मिळवला शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे मुलींचा संघ विविध स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम येऊन त्यांची विभागीय स्तरावर निवड झाली. अपूर्वा भराटे,साक्षी भराटे, नम्रता कुरुंद,श्रावणी कुरुंद,पूजा कुरुंद,अनुजा पवार,संचिता यादव, श्वेता भोसले,अक्षता माळकर, भक्ती माळकर,गायत्री माळकर,सुप्रिया कदम इ. विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. त्याप्रसंगी उपस्थित ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा या संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार, उपप्राचार्य डॉ.सतीश लोमटे,डॉ.संजय कांबळे, डॉ.आबासाहेब बोंदर,डॉ. ज्ञानेश चिंते,डॉ.दीपक सुर्यवंशी,डॉ. नागनाथ अदाटे,क्रीडामार्गदर्शिका श्रीमती वायबसे एस.एस, प्रा.मीनाक्षी जाधव, विलास अडसूळ,रुपेश मानेकर,हनुमंत जाधव, अरविंद शिंदे,उमेश साळुंके तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात