कळंब – येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या सभागृहात नुकत्याच बीड येथे झालेल्या नॅशनल अबॅकस स्पर्धेचे बक्षीस वितरण मोठ्या उत्साहात पार पडले. अबॅकस च्या माध्यमातून गणिताचे शिक्षण घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ अशोक मोहेकर यांनी केले. कळंब येथील ब्रेन मास्टर अबॅकस क्लासेस द्वारे आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अशोक मोहेकर तर प्रमुख उद्घाटक म्हणून धाराशिव-कळंब मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कैलास घाडगे पाटील,ह.भ.प.महंत भगवान महाराज वरपगावकर,माजी नगराध्यक्ष पांडुरंग कुंभार, रोटरी अध्यक्ष अरविंद शिंदे, रोटरी सचिव अशोक काटे, डॉ.अशोक शिंपले, प्रा.दिलीप पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉ.अशोक मोहेकर म्हणाले की,अबॅकस च्या माध्यमातून गणित हा विषय सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना अवगत करता येतो व विद्यार्थ्यांना गणित विषयाबद्दल असलेली भीती नाहीशी होऊन, मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती आणि आत्मविश्वास वाढायला मदत होते आणि मुले पाढे पाठ न करता म्हणू शकतात. तसेच अबॅकसमूळे भविष्यात स्पर्धा परीक्षेसोबत पुढील शिक्षणासाठी याचा फायदा होईल. कळंब शहरात सौ. प्रा. रेशमा सावंत (शिनगारे) यांनी ब्रेन मास्टर अबॅकस क्लास प्रथमच सुरू करून विद्यार्थ्यांना गणित विषयाची सोपी पद्धत उपलब्ध करून दिली. याबद्दल देखील त्यांनी कौतुक केले. या स्पर्धेत स्वरा ढोले, प्रणिती गायकवाड, शौर्य नांदे , स्वराज सावंत, अबूजार सय्यद, राजवीर शेळके, आरोही बारकुल, अनुश्री मुंडे, क्षितिजा चौधरी, स्नेहल कदम, आविष्कार कुंभार, नरेंद्र सावंत, प्रियांशु घुले, स्वराज नव्हाट, अभव्या पारवे, साईशा खेमनार, स्वरा ठोंबरे, स्वरा शिनगारे, परी उगिले, राजवीर काळे, राघव लांडगे, वेदिका ठोंबरे पल्लव काळे, नम्रता काळे, अरहम पिंजारी, आदित्य वायबसे, वेंकटेश गदळे, प्राची भवर, विवेक पांचाळ, तन्मय कोळेकर, मनस्वी काळे, सौंदर्या टेकाळे, आर्या गायकवाड, वेदांत तोडकर, श्रेया काळे, श्रुती नव्हाट, राजवीर भवर, गार्गी बोधले, प्रियांशु भवर, पंकजा जवंजाळ, पवन कोळेकर, समृद्धी पवार इत्यादी विद्यार्थ्यांनी या नॅशनल अबॅकस कॉम्पिटिशन मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके मिळवली आहेत. यावेळी विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ब्रेन मास्टर अबॅकस च्या संचालिका सौ. रेशमा सावंत (शिनगारे) यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा.रणजित वरपे व आभार प्रदर्शन प्रा.डॉ.वर्षा सरवदे यांनी केले.या कार्यक्रमाला क्रीडाशिक्षक लक्ष्मण मोहिते,सीए दत्तात्रय टोणगे, प्रा.अर्चना बावीकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.संजय सावंत,ईश्वर काळे,नितीन काळे, प्रतीक गायकवाड, प्रा.मेहराज तांबोळी, शुभम वळेकर,ओंकार तोडकर, सुशांत व्यवहारे, अजित शिनगारे यांनी अथांग परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाची सांगत राष्ट्रगीताने झाली.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात