कळंब – महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले समाजरत्न पुरस्काराने बीड धाराशिव लातूर येथील निवडक समाजसेवक आरोग्य शैक्षणिक गरजवंतांना मदत पुरविणारे अशा व्यक्तींचा महात्मा ज्योतिबा फुले समाज रत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणिस् खान पठाण, संस्थेचे संस्थापक श्रीराम घुले मराठवाडा अध्यक्ष उषा धावरे,सिद्धार्थ कोटेकर,डॉ. खाजा शेख, अच्युत माने व इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमात साप्ताहिक साक्षी पावन ज्योतचे विशेष प्रतिनिधी राजेंद्र (भाऊ) पांडुरंग बारगुले व्हॉईस ऑफ मीडियाचे कळंब तालुका सदस्य यांना महात्मा ज्योतिबा फुले समाज रत्न पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले व पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात