August 9, 2025

गुरुपौर्णिमा

  • गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
    गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः
  • भारतीय संस्कृतीमध्ये आषाढ शुद्ध पौर्णिमेला ‘गुरुपौर्णिमा’असे म्हणतात. कारण या दिवशी आद्य गुरु महर्षी व्यासांचा जन्मदिवस आहे.म्हणून या पौर्णिमेला ‘व्यास पौर्णिमा’ पौर्णिमा असेही म्हणतात.कारण याच दिवशी महर्षी व्यासांनी महाभारत या ग्रंथाची सुरुवात केली .या ग्रंथातून त्यांनी मानसशास्त्र आणि व्यवहार शास्त्राचे दर्शन घडवले . गुरु हे ईश्वराचे रूप असून त्यांनी दिलेल्या ज्ञानामुळे शिष्य हे जीवनामध्ये यशस्वी होत असतात.जीवनात चांगले गुरु मिळणं हे भाग्यच लक्षण समजलं जातं .गुरु म्हणजे ‘मार्गदर्शक’ आणि ‘पौर्णिमा ‘म्हणजे प्रकाश गुरुकनवून मिळालेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमान करणे म्हणजेच गुरुपौर्णिमा होय.गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस .प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये गुरु हा असतोच .सर्वांच्या आयुष्यातील प्रथम गुरु म्हणजे आई .कारण आई हेच आपली पहिली गुरु असते. जगातील प्राथमिक ज्ञान आपण आपल्या प्रथम गुरू म्हणजेच आईकडून घेतो . म्हणूनच ‘आचार्य देवो भव :’ उसे म्हणतात .या शिकवणी मुळेच भारतात गुरुपौर्णिमा आजही श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. म्हणूनच संत कबीरदास म्हणतात,गुरु गोविंदू दोनो खडे । काके लागू पाँव बलिहारी गुरु अपने गोविंदू दिये बताये । प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये गुरुचे अनन्यसाधारण महत्त्व आहे .गुरु पूजनाचा खरा अर्थ आपल्या गुरुने दिलेले ज्ञान आत्मसात करणे असा होय .गुरूकडून मिळालेले ज्ञानाचे आचरण करणे, तसेच गुरूंबद्दल सतत कृतज्ञ भाव असणे आणि या कृतज्ञते पोटीच गुरूंची सेवा आणि आदर करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने गुरुची सेवा होय .शिष्याच्या प्रगतीमध्येच गुरुचा खरा आनंद सामावलेला असतो .आणि गुरूंपेक्षाही त्याचा शिष्य मोठा होणं हे खऱ्या अर्थाने त्या गुरुचे भाग्य असते .एक प्रकारे हा गुरुचा सन्मानच असतो .खरा गुरु तोच ज्याच्या पेक्षाही त्याचे शिष्य मोठे होतात . आपल्या शिष्याच्या भल्याचा विचार करून स्वतः जवळील ज्ञान निरपेक्षपणे आणि प्रामाणिकपणे शिष्यास देणे हेच गुरुचे खरे कार्य असते.ज्ञान देताना गुरूंना कधीही अहंकार नसावा शिष्याला गुरुजी जेवढी गरज असते तेवढीच गरज गुरूनांही शिष्याची असली पाहिजे.शिष्य नसेल तर गुरु आपले ज्ञान कोणाला देणार.म्हणून गुरूंनी देखील आपल्या शिष्यवृत्ती कृतज्ञ असावे . प्राचीन काळापासून भारतामध्ये गुरु शिष्यांची परंपरा आजही टिकून आहे .
    श्रीकृष्ण – अर्जुन,अर्जुन – द्रोणाचार्य,चाणक्य -चंद्रगुप्त, ‘रामकृष्ण परमहंस – स्वामी ‘विवेकानंद’,’ रामदास स्वामी -शिवाजी महाराज’अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील .गुरु आपल्या शिष्यासाठी अनेक वर्षांची तपश्चर्या साधना पणाला लावत असतो.गायन क्षेत्रातील अनेक गायांची गायकांच्या गुरुवरुन त्यांच्या गाण्याची गरज असते .थोडक्यात जीवनात गुरु शिवाय पर्याय नाही हेच यावरून सिद्ध होते.परंतु खरा गुरु कसा ओळखावा ? जो गुरु शिष्याच्या कल्याणाचा विचार करतोआणि त्याला अचूक दिशा दाखवतो योग्य सल्ला देतो .तसेच शिष्याविषयी ज्याची अंतरीक तळमळ असते .शिष्याची प्रगती पाहून ज्याला आनंद होतो तोच खरा गुरु असे मी म्हणेन . गुरुंनी सांगितलेल्या मार्गावर चालण्यासाठीशिष्यांमध्ये देखील काही गोष्टी असं गरजेचं असतं .गुरुंबद्दल नम्रपणा,आदर, विश्वास,प्रेम तसेच गुरुचे कार्य पुढे नेण्याची जिद्द असली पाहिजे . आजही शाळा कॉलेज व्यावसायिक क्षेत्रातील शिष्य या दिवशी आपल्या गुरूंची कृतज्ञता व्यक्त करतात .जीवनभर गुरुने दिलेले ज्ञान आणि मार्गदर्शन यांच्यामुळेच ते यशस्वी होतात .म्हणून आपल्या गुरूंविषयी ऋण व्यक्त करण्याचा हा दिवस . चारित्र्याचा सर्वांगीण विकास हेच शिक्षणाचे उद्दिष्ट असते .आणि गुरु हे उद्दिष्ट साध्य करण्याचे माध्यम असते .म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचे महत्व देवांनी देखील . मान्य केले आहे.म्हणूनच म्हणावेसे वाटते , ” स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात.स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते आणि यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात. अनिता प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लागतात”! गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

शब्दांकन — सौ.अर्चना कुलकर्णी
बावीकर
कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल ,कळंब

error: Content is protected !!