मोहा – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार विद्यालय मोहा येथील प्राथमिक शाळेमध्ये दि.२० जुलै २०२४ रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंना वंदन करण्याचा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी आयोजित केला.या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप, चिलवंत राजाभाऊ,शेवाळे कमलाकर,सोलंकर शहाजी , श्रीमती पांचाळ उषा ,श्रीमती . सोनवणे निता आदीं मान्यवर यावेळी उपस्थित होते. भारतातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात केली .या कार्यक्रमांमध्ये कु . सानिका बाराखोते हिने आपल्या गुरुची महती पटवून देऊन आपले मनोगत व्यक्त केले .तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप यांनी आपले थोडक्यात मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती . सोनवणे निता यांनी केले तर आभार प्रदर्शन शेवाळे कमलाकर यांनी केले .या कार्यक्रमासाठी गावातील पालक तसेच विद्यार्थी ,विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते .
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले