कळंब – विद्याभवन हायस्कूल कळंब या प्रशालेत अखिल भारतीय साने गुरुजी कथामला जिल्हा समिती सोलापूरच्या अंतर्गत ‘ साने गुरुजी शतकोत्तर रोप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त’ सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात आली.या स्पर्धेचे आयोजन प्रशालेतील मराठी विभाग प्रमुख नवोपक्रमशील शिक्षक,अखिल भारतीय साने गुरुजी कथामला शाखा कळंब अध्यक्ष सोपान पवार यांनी केले होते ही स्पर्धा आयोजित करण्याचा हेतू सध्याचे युग हे स्पर्धेचे विज्ञानाचे ,ज्ञानाचे युग आहे .या स्पर्धेत विद्यार्थी उतरला पाहिजे टिकला पाहिजे प्रज्ञानवंत बनला पाहिजे विद्यार्थीना शालेय शिक्षणापासूनच स्पर्धा परीक्षेची गोडी अभिरुची निर्माण व्हावी,त्यांनी अशा स्पर्धेची तयारी करावी. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी वाचन करावे .सध्या शासनाच्या विविध विभागात स्पर्धा परीक्षेशिवाय नोकरी मिळत नाही त्याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी याविषयी अखिल भारतीय साने गुरुजी कथामला अध्यक्ष सोपान पवार यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व समजावून सांगितले. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेला उदंड असा प्रतिसाद दिला . यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ही स्पर्धा दोन विभागात घेण्यात आली अ गट पाचवी ते सातवी व ब गट आठवी ते दहावी या दोन गटात घेण्यात आली या दोन्ही गटातील एकूण विद्यार्थी 239 परीक्षेला बसले होते या परीक्षेला विद्यार्थ्यांनी उदंड असा प्रतिसाद दिला सहभाग नोंदविला . या दोन्ही गटातील प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे ही स्पर्धा अखिल भारतीय साने गुरुजी कथामला शाखा कळंब अध्यक्ष सोपान पवार, आनंद रामटेके, विक्रम मयाचारी, आप्पासाहेब वाघमोडे, शुभम जगताप, सुरज मडके आदी शिक्षकांनी स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी परिश्रम घेतले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात