August 9, 2025

”स्किल बेस” शिक्षणाला जागतिकीकरणात मोठी संधी – डॉ.ए.एम.देशमुख

  • धाराशिव – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,उपपरिसर धाराशिव येथील व्यवस्थापन शास्त्र विभागामार्फत एम,बी ए. आणि एम.सी.ए. विषयाला या वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी कार्पोरेटच्या धरतीवरती “इंडक्शन कार्यक्रमाचे” आयोजन करण्यात आले. कार्पोरेट मध्ये एखादा कर्मचारी जेव्हा आपल्या नोकरी साठी रुजू होतो तेव्हा त्यासंबंधित कंपनीचे ध्येय धोरण, उद्दिष्ट, कार्यप्रणाली, वातावरण आणि भविष्याचे नियोजन याच्या बाबतीत सुरुवातीचे काही काळ मार्गदर्शन दिले जाते. याच पद्धतीने व्यवस्थापन शास्त्र विषय हा व्यावसायिक अभ्यासक्रमाशी निगडित असल्यामुळे विभागामार्फत “इंडक्शन कार्यक्रमाचे” आयोजन या वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आले.
    सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मायक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ इंडिया चे अध्यक्ष डॉ.ए.एम. देशमुख, कार्यक्रम अध्यक्ष म्हणून विद्यापीठ उपपरिसराचे संचालक डॉ.प्रशांत दीक्षित, व्यवस्थापनशास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. वरून कळसे उपस्थित होते. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. प्रा. सचिन बस्सैये आणि डॉ. विक्रम शिंदे यांनी विविध विषयावरती मार्गदर्शन केले. उद्घाटन कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुण्यांनी भारतात आणि जगात उपलब्ध असणाऱ्या नवनवीन संधी आणि त्यासाठी लागणाऱ्या “स्किल” या कशा आत्मसात केल्या जाऊ शकतात यावरती मार्गदर्शन केले. उप परिसर संचालक डॉ. दीक्षित यांनी व्यवस्थापन शास्त्र विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमाचे आणि प्रगतीचे कौतुक केले. व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव यांनी विभागाचा मागील 14 वर्षापासूनचा लेखाजोखा मांडला आणि पुढील काळामध्ये काय काय उपक्रम नियोजित आहेत व ते कसे साध्य केले जातील याची माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भक्ती क्षीरसागर यांनी केले तसेच आभार कार्यक्रम समन्वयक प्रा. वरून कळसे यांनी मानले. कार्यक्रमास प्रा. शीतलनात एखंडे, प्रा. शरद सावंत विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!