कळंब – बीड येथे झालेल्या नॅशनल समर कॉम्पिटिशन कळंबच्या ब्रेन मास्टर प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लासेसच्या युकेजी पासून इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी यश मिळवून भरघोस पारितोषिक पटकावली. या कॉम्पिटिशनमध्ये मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमधून 850 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या सर्व विद्यार्थ्यांना मागे टाकेत कळंबच्या ब्रेन मास्टर प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी उतुंग भरारी घेत 43 पारितोषिके पटकावली. विशेष म्हणजे 47 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता त्यापैकी 43 विद्यार्थ्यांना पारितोषिके मिळाली,भरघोस बक्षीस प्राप्त करणारा स्पर्धेतील एकमेव क्लास असल्यामुळे ब्रेन मास्टर अबॅकस क्लासेस ला बेस्ट सेंटर अवार्ड प्राप्त झाला.
या स्पर्धेतील 6 मिनिटात 100 गणित अचूकपणे सोडवणारे विद्यार्थ्यांथी – स्वरा ढोले, प्रणिती गायकवाड,शौर्य नांदे,स्वराज सावंत,अबूजार सय्यद,राजवीर शेळके,आरोही बारकुल,अनुश्री मुंडे,क्षितिजा चौधरी,स्नेहल कदम,आविष्कार कुंभार,नरेंद्र सावंत,प्रियांशु घुले,स्वराज नव्हाट,अभव्या पारवे,साईशा खेमनार,स्वरा ठोंबरे,स्वरा शिनगारे,परी उगिले,राजवीर काळे,राघव लांडगे,वेदिका ठोंबरे पल्लव काळे,नम्रता काळे,अरहम पिंजारी,आदित्य वायबसे,वेंकटेश गदळे,प्राची भवर,विवेक पांचाळ, तन्मय कोळेकर,मनस्वी काळे, सौंदर्या टेकाळे,आर्या गायकवाड, वेदांत तोडकर,श्रेया काळे,श्रुती नव्हाट, राजवीर भवर, गार्गी बोधले, प्रियांशु भवर, पंकजा जवंजाळ, पवन कोळेकर, समृद्धी पवार इत्यादी विद्यार्थ्यांनी या नॅशनल अबॅकस कॉम्पिटिशन मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके मिळवली आहेत.
वरील सर्व विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत मोठे यश मिळवत ब्रेन मास्टर प्रोऍक्टिव्ह अबॅकस चे नाव उज्वल केले. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ब्रेन मास्टर अबॅकस च्या संचालिका सौ. रेशमा शिनगारे (सावंत) यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले आहे. कळंब शहरातील आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अबॅकस नॅशनल स्पर्धेमध्ये मिळवलेले मोठे यश पाहून सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन