कळंब (विशाल पवार ) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक विद्याभवन हायस्कूल कळंब प्रशाला येथील विद्यार्थ्यांनी सन २०२३-२४ शैक्षणिक वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यामध्ये विसाव्या क्रमांकाने दर्शन जनार्धन भामरे हा विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे. व शिष्यवृत्ती धारक बनला आहे. इयत्ता पाचवी वर्गातून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढील प्रमाणे योगेश्वरी मुंडे, प्रांजल शिंदे, ध्रुव डिकले, राघव कल्याणकर, वेद ढेपे तसेच इयत्ता आठवी मधून शिष्यवृत्तीधारक झालेले विद्यार्थी दर्शन भामरे,वंदिता कोठावळे, दुर्वी गव्हाणे, मनीषा शिंदे, प्रथमेश शिंदे, पार्थ भिसे, आदी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीधारक होत प्रशालेची गुणवत्ता व दबदबा कायम राखला आहे. या यशाबद्दल त्यांचा प्रशालेत नुकताच सत्कार करण्यात आला.त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर, अध्यक्ष अनिल बापू मोहेकर, मुख्याध्यापक विलास पवार, पर्यवेक्षक विक्रम मयाचारी, सुनिल बारकुल, सुशील तीर्थकर, ज्योतीराम सोनके, पवार एस जे, आनंद रामटेके, रविकांत कोल्हे, सुरज मडके, संदीप पाटील, निशांत जिंदमवार, विशाल पवार, आप्पासाहेब वाघमोडे,आदींसह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन