August 9, 2025

श्रीलक्ष्मी सेवाभावी सामाजिक संस्थेकडून श्री गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत

  • जवळा (खु) – आषाढी एकादशीनिमित्त १३ जून रोजी निघालेली श्री क्षेत्र शेगाव येथील श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे ०५ जुलै रोजी कळंबहून सकाळी ७ वाजता प्रस्थान झाली. ०५ जुलै रोजी सकाळी ठिक १० वाजता जवळा (खु.) पाटीवर डॉ.सौ. सरोजनीताई संतोष राऊत यांनी श्रीलक्ष्मी सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने पंढरपूरकडे पायी चाललेल्या पालखीचे फुलांच्या वर्षावाने व आतषबाजी लावून स्वागत करण्यात आले. तसेच पालखी सोबत दिंडीमध्ये पायी चालत आलेल्या वारकरींकरिता पिण्याच्या पाण्याची व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. या पालखी सोहळ्यात जवळपास ७०० वारकरी, २५० पेक्षा जास्त पताकाधारी, २५० टाळकरी, २०० सेवेकरी, २ रूग्ण वाहिका, ३ मालट्रक, ३ अश्व, १ प्रवासी बस सहभागी होते.
    १५ जुलै ते २० जुलै पालखीचा पंढरपूरमध्ये मुक्काम राहणार असून २१ जुलै रोजी पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल. गजानन महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम १३ जून रोजी पारस येथे झाला होता. पुढे १४ जून भौरद, १५ व १६ जून अकोला, १७ जून वाडेगाव, १८ जून पातुर, १९ जून श्री क्षेत्र डवहा, २० जून श्री क्षेत्र शिरपूर, २१ जून महसला पेन, २२ जून रिसोड, २३ जून सेनगाव, २४ जून दिग्रस, २५ जून जवळा बाजार, २६ जून श्री क्षेत्र त्रिधारा, २७ जून परभणी, २८ जून दैठणा, २९ जून गंगाखेड, ३० जून परळी थर्मल, १ जुलै परळी वैजनाथ, २ जुलै अंबाजोगाई, ३ जुलै बोरी सावरगाव तर काल ४ जुलै रोजी कळंब येथे मुक्काम असा प्रवास करत आज दिनांक ५ जुलै रोजी ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखाना येथे पालखी मुक्कामी असणार आहे. तर पुढे तेर, धाराशिव, तुळजापूर, सोलापूर मार्गे १५ जुलै रोजी पंढरपूर येथे पालखीचे आगमन होईल. १५ जुलै ते २० जुलै पर्यंत पालखीचा पंढरपूर मुक्काम राहणार आहे.
    २१ जुलै रोजी पंढरपूर येथून पालखीचे प्रस्थान होणार असून परतीचा मुक्काम करकंब, कुरडूवाडी वाडी, उपळाई स्टेशन, भगवान बार्शी, भूम, चौसाळा, पाली, बीड, गेवराई, शहापूर, लालवाडी, जालना, सिंदखेडराजा, बीबी, लोणार, मेहकर, जानेफळ, शिरला नेमाने, आवार, खामगाव मार्गे शेगाव येथे पालखी पोहोचणार आहे. श्री गजानन महाराज संस्थानकडून पालखीची नियोजनबद्ध तयारी केलेली आहे.
error: Content is protected !!