August 9, 2025

कळंब तालुक्यातील २० शाळांना संपर्क टीव्ही डिवाइस वितरण

  • कळंब – संपर्क फाउंडेशनच्या माध्यमातून कळंब तालुक्यातील २० शाळांना संपर्क टीव्ही डिवाइस वाटप करण्यात आले. संपर्क टीव्ही डिवाइस हे संपर्क फाउंडेशनचा नवाचार आहे जे की ऑफलाइन असून याच्यामध्ये
    महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम आहे. ज्यामध्ये  वर्ग १ ते ५ च्या अभ्यासक्रम आधारित लेसन प्लॅन, लेसन व्हिडिओ, वर्कशीट, गेमिफाईड असेसमेंट अशा संसाधनांचा समावेश आहे. जे अध्यापन व अध्ययन प्रक्रिया सुलभ करण्यात मदत करते.  
  • संपर्क फाऊंडेशन ही ग्रेटर नोएडा स्थित सामाजिक संस्था असून देशभरात ८ राज्यात तर महाराष्ट्रात एकूण १० जिल्ह्यात सरकारी शाळांत अध्ययन निष्पती वाढविण्यासाठी योगदान देतेय अशी माहिती धाराशिव कार्यक्रम समन्वयक अक्षय शिनगारे यांनी दिली.
  • यावेळी कळंब तालुका गट शिक्षणाधिकारी धर्मराज काळमाते व विस्तार अधिकारी संतोष माळी यांचे मार्गदर्शन लाभले.
error: Content is protected !!