August 9, 2025

उत्तुंगतेज बालवैज्ञानिक परीक्षेचा निकाल जाहीर

  • चौसाळा – जवळाबाजार जि.बीड येथील उत्तुंग तेज फाउंडेशनद्वारा घेण्यात आलेल्या उत्तुंगतेज बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेचा निकाल दि.१५ जून रोजी सकाळी ९ वाजता जाहीर झाला. राज्यभरातून एकूण २३०० विद्यार्थ्यांनी २८ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा दिली होती. गुणवत्ता यादीनुसार ३०० विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली होती. यामध्ये इयत्ता ५ वी ते ७ वी या गटातून १५० तर ८ वी ते १० वी गटातून १५० विद्यार्थी होते. ऑनलाईन पद्धतीने मुलाखतीतून ६५ विद्यार्थ्यांचे इस्रो आयआयटी सायन्स सिटी येथे विज्ञान अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली. यामध्ये गोरे इंग्लिश स्कूलचे दोन चमकते तारे, रिया यशवंत गुंजाळ हिने १५० पैकी १२५ गुण घेऊन राज्यातून २ रा.क्रमांक मिळवला तर अजय दत्तात्रय शिंदे यांने १५० पैकी १११ गुण घेऊन राज्यातून १४ वा क्रमांक पटकावून इस्रो विज्ञान अभ्यास दौऱ्यासाठी हे विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यांच्या घवघवीत यशाबद्दल शाळेचे संस्थापक चंद्रकांत गोरे, प्रा.अंजली गोरे,इंग्रजी विषयाचे मार्गदर्शक सहशिक्षक विकास शिंदे यांनी विद्यार्थ्यांचा व पालकांचा भव्य सत्कार केला.
error: Content is protected !!