कळंब – कृषि उत्पन्न बाजार समिती,कळंब ने पुढाकार घेवून येथे जिल्हातील सर्व बाजार समितीच्या सभापतींची बैठक संपन्न झाली.या मध्ये अवैद्य खरेदी व नियंत्रण या वर सखोल चर्चा झाली.आता पर्यंत पहिल्यांदाच अशी बैठक घेण्यात आली.
बाजार आवारात सोयाबीनची चांगली आवक व्हावी म्हणून व खेड्यातील अवैद्य खेडा खरेदी,थेट पणन,सिंगल परवाना व एफ.पी.ओ.च्या माध्यमातून खरेदी होत असलेल्या अवैद्य खरेदीवर नियंत्रण करण्या करीता कृउबास कळंबचे सभापती शिवाजी कापसे यांचे अध्यक्षतेखाली सभापती व सचिवांची बैठक आयोजीत करण्यात आली होती.
सदर बैठकीस कृउबास केज चे सभापती अंकुश इंगळे, सचिव संतोष देखमुख,दिलीपराव गुळबिले,धाराशिवचे सचिव,वाशीचे सभापती व सचिव, कळंबचे व्यापारी संचालक कोल्हे नाना ,रोहन पारख, भूम , मुरूड चे प्रतिनीधी उपस्थित होते.
या बैठकीत जवळ च्या खेडेगावात राजरोसपणे विना परवाना तसेच परवाना घेवूनही विना पावती चे व्यवहार करणारे व्यापारी, शेतकऱ्यांची फसवणूक करतात यातून अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. याला आळा बसावा , या करीता कळंब बाजार समितीने जिल्हातील पदाधीकाऱ्यांची बैठक आयोजीत करून चर्चा केली.
खेडा खरेदी, तसेच थेट पणन च्या नावाखाली मोठमोठे अवैद्य केंद्र स्थापन करून, प्रक्रिया च्या नावाखाली खरेदी करणाऱ्या कंपन्यांनाही इथून पुढे कायद्याच्या कचाट्यात घेण्याचे ठरले आहे. मोठमोठ्या कंपण्या थेट पणन च्या परवाना च्या अटी शर्तीचे अनेक वेळा उल्लंघन केलेले दिसून येत आहेत असे सचिव दत्तात्रय वाघ यांनी कागदपत्रासह सर्व माहीती बैठकीत सादर केली.
अवैध रित्या खरेदी करणाऱ्यावर कडक निर्बंध लावन्यात येणार,
विना गेट पास अथवा सेस पावती न भरलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचे सर्वानुमते ठरले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात