August 9, 2025

महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे आढाळा फिडर वरील गावे अंधारात

  • खोंदला – ति कधी येईल आणि कधी जाईल याचा काहीं नेम नाही. खोंदला,सात्रा भाटसांगवी,आडाळा फिटर वरील गावे महावितरणच्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झाले आहेत.घरात उकाडा आणि दारात मच्छर,, अशी परिस्थिती बघावयास मिळत आहे. उन्हाचा पारा ४० च्या उंबरठ्यावर त्यामुळे अंगाची लाई लाही यात अधून मधून ढगाळ वातावरण अन आद्रता युक्त हवामान अशा घालमेल वाता वरणात ती कधी जाते आणि कधी येते याचा ताळमेळ राहिलेला नाही, या भागातील वीज वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रात्री अपरात्री फॉल्ट सापडताना ससे हेलपाट करावे लागत आहेत. महावितरणच्या या भोंगळ कारभारांचा संताप व्यक्त करावा तरी कोणाकडे कारण महावितरण चे अधिकारी आणि कर्मचारी हे फोन तर घेतच नाहीत आणि क्षुल्लक प्रॉब्लेम असताना त्याच्याकडे डोळेझाक करत आहेत , असाच प्रश्न नागरिकापुढे निर्माण झाला आहे.
    याबाबत सविस्तर वृत्त असे की, कळंब शहरालगत असणाऱ्या खोंदला सात्रा,भाटसांगवी ही गावे आढाळा फिटर वरती जोडलेले आहेत या भागातील वीज पुरवठा मागच्या महिन्याभरापासून वारंवार विद्युत पुरवठा सेवेचा खेळ खंडोबा झालेला पाहायला मिळते आहे. यात मागच्या आठ दिवसात अधिकच भर पडली आहे. विद्युत पुरवठा व्यवस्थित नसल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
    महावितरण ने विजेचे मान्सूनपूर्व देख बाल दुरुस्ती कामे करणे गरजेचे आहे,
    सध्या महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेतील बहुतांश सामग्री उघड्यावर असल्याने वातावरणात होणाऱ्या या बदलाचा प्रतिकूल परिणाम वीज वितरण यंत्रणेवर होत आहे. पर्यायाने त्याचा परिणाम ग्राहक आणि लहान मुले अबाल वृद्धांवर होत आहे, त्यामुळे उन्हाळा अवकाळी पाऊस व त्यानंतर लगेच सुरू होणारा पावसाळा हा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा. यासाठी महावितरणने सेल झालेले कार्टन व स्पन घट्ट करणे ,दोन खांबांमधील झोल पडलेल्या तारा ओढुन घेणे, सर्व खांब आणि त्यांचे ताण सुस्थितीत करणे अपेक्षित आहे ,वीज रोहित त्रांची तपासणी करून तेलाची योग्य पातळी राखणे, स्टे वायरने विज खांबाचा आधार मजबूत करणे ,रोहीत्राचे अर्थिंग मजबूत ,करणे, पोल वितरण पेट्या, फिटर फीलर्स मिनी फिटर पिलर या सर्वांचे अर्थिंग सुस्थितीत करणे वीज तारांजवळील झाडाच्या फांद्याची छाटणी करणे फुललेले पिन आणि इन्सुलटर बदलणे तपासणी व दुरुस्ती करणे वाहिन्यांचे खराब झालेले लायनिंग रजिस्टर बदलणे भूमिगत वाहिन्यांचे तात्पुरते असलेले जॉईंट कायमस्वरूपी करणे वाहिन्यांचे खराब झालेले जंपर बदलणे जीर्ण झालेल्या वायर बदलणे पावसाचे पाणी साचणाऱ्या परिसरात फिडरचे पिलरची जमिनीपासून उंची वाढवणे आदी मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे तत्काळ करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.
error: Content is protected !!