August 9, 2025

पंचशील ध्वजाचा विजय असो…च्या घोषणांनी शहर दुमदुमले

 

  • कळंब – जगाला शांततेचा संदेश देणारे महाकारूणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५६८ व्या जयंतीनिमित्त दि.२३ मे २०२४ रोजी कळंब शहरातील व तालुक्यातील सर्व बौद्ध उपासक व उपसिकांच्या वतीने
    विशाल बुद्ध रॅलीचे आयोजन
    करण्यात आले होते.
    इंदिरा नगरातील लुंबिनी बुद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीस सुरुवात झाली.
    ही रॅली पुढे इंदिरा नगर ते जुने पोलीस स्टेशन-बागवान चौक-सोनार गल्ली-विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक-छत्रपती शिवाजी महाराज चौक-पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक ते गार्डनमधील पुतळा परिसर येथे तथागत बुद्ध मूर्ती व पूर्णाकृती पुतळयास लहान बालकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिकरित्या त्रिशरण पंचशील व पूजापाठ करून विसर्जित करण्यात आली.
    या विशाल रॅलीत शंकर वाघमारे,किशोर वाघमारे, शिवाजी सिरसट,लहू तिरकर,आकाश वाघमारे,पप्पू बचुटे,भारतीय बौद्ध महासभेचे सी.आर.घाडगे,राजाराम वाघमारे,मारुती गायकवाड,ज्येष्ठ साहित्यिक के.व्ही.सरवदे,रमेश बोर्डेकर,डॉ.शंकर कांबळे,मुकुंद साखरे,प्रा.अरविंद खांडके,सतपाल बनसोडे,बाळासाहेब हौसलमल,सुशील वाघमारे,महेंद्र रणदिवे,माजी नगरसेवक सुनील गायकवाड,राजाभाऊ गायकवाड,प्रमोद ताटे,सुमित रणदिवे,भाऊसाहेब कुचेकर, प्रा.अविनाश घोडके,सूयोग गायकवाड,गौतम सिरसट,माजी नगरसेविका सरला सरवदे,माजी नगरसेविका वनमाला वाघमारे,सुनंदा गायकवाड,मनिषा बनसोडे आदी शहरातील इंदिरा नगर,भीमनगर,कल्पना नगर,सम्राट अशोक नगर,यशवंत नगर मधील बौद्ध उपासक,उपसिका,तरुण वर्ग बहुसंख्येने उत्साहात सामिल होता.
error: Content is protected !!