धाराशिव (नेताजी जावीर) – जगाला शांततेचा संदेश देणारे विश्व शांतीदुत तथागत गौतम बुद्ध यांची २५८६ वी जयंती साजरी करण्यात आली,म.ज्योतिबा फुले व महामानव,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आकर्षक असा बुध्द गुफा देखावा सादर करण्यात आला होता.हा देखावा बुद्ध पौर्णिमा पर्यंत ठेवण्यात आला आहे.पिंपळ वृक्षाखाली (बोधी वृक्ष) ध्यानस्थ बसलेल्या भुमी स्पर्श गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस समितीच्या पदाधिकारी सह शहरवासीयांनी अभिवादन केले.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन सामुदायिक त्रिशरण घेण्यात आले.फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेतील आकर्षक अशा बुध्द गुफा देखाव्यास पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.यावेळी अंकुश उबाळे, गुणवंत सोनवणे,बाबासाहेब बनसोडे धनंजय वाघमारे, गणेश रानबा वाघमारे,संजय गजधने,संग्राम बनसोडे,बलभीम कांबळे, संपतराव शिंदे,रमेश कांबळे,स्वामीनाथ चंदनशिवे,अतुल लष्करे,मेसा जानराव,पुष्पकांत माळाळे, नितिन बनसोडे,मुकेश मोटे,स्वराज जानराव,विशाल घरबुडवे,श्रीकांत गायकवाड,बाबासाहेब जानराव, विद्यानंद वाघमारे, राजाराम बनसोडे,सोहन बनसोडे,अमोल लष्करे,बाबा कांबळे, महिला भगिनी सह अन्य इतर उपस्थित होते.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला