धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.11 मे रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 196 कारवाया करुन 1,32,150 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
नळदुर्ग पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान नळदुर्ग पोलीसांनी दि.11.05.2024 रोजी 14.05 ते 14.40 वा. सु. नळदुर्ग पो.ठाणे हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे- 1) संजयकुमार लिंबाजी गायकवाड, वय 34 वर्षे, रा. बौध्दनगर नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 14.40 वा. सु. नळदुर्ग ते अक्क कलकोट जाणारे रोडचे कडेला हॉटेल उडप्पी समोर कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 960 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. आरोपी नामे- 2) माजीद आरेफ कुरेशी रा. इंदीरानगर नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 14.05 वा. सु. नळदुर्ग गावातील बसस्थानकचे बाजूला कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 560 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
बेंबळी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान बेंबळी पोलीसांनी दि.11.05.2024 रोजी 12.35 वा. सु. बोरखेडा रोडलगत लखन कसपटे याचे वॉशीग सेंटरचे बाजूला बेंबळी येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे- 1) किशोर महादेव सोनटक्के, वय 40 वर्षे, 2) सुर्यकांत अंबादास दंडगुले, वय 45 वर्षे, रा. बेंबळी ता. जि. धाराशिव हे 12.30 वा. सु. बोरखेडा रोडलगत लखन कसपटे याचे वॉशीग सेंटरचे बाजूला बेंबळी येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 2,700 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने: जुगार विरोधी कारवाई दरम्यान दि.11.05.2024 रोजी 14.30 ते 16.30 वा. सु. नळदुर्ग व उमरगा पोठा हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे- 1) राम महादप्पा गावंडे, वय 58 वर्षे, र. धनगर गल्ली कुंटेकुर ता. उमरगा जि. धाराशिव हे 14.30 वा. सु. नळदुर्ग ते धाराशिव रोडचे डावे बाजूला शसकीय दवाखान्या जवळ कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,800 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. आरोपी नामे- 2) युनुस सिकंदर मुल्ला, वय 60 वर्षे, रा. कार्ले प्लॉट उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे 16.30 वा. सु. डिग्गी रोड महादेव रेस्टॉरंट समोरील बाजूस मिलन डे मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,120 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये संबंधीत पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
“ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
उमरगा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) शिवाजी प्रभाकर मंजुळे, वय 31 वर्षे, रा. कुन्हाळी ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.10.05.2024 रोजी 20.40 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल एमएच 25 जे 289 ही पोलीस ठाणे उमरगा समोर सोलापूर हैद्राबाद रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
लोहारा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- इंदुमती देविदास भालेरव, वय 47 वर्षे, रा.तोरंबा ता. लोहारा जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 01.05.2024 रोजी 02.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील 34 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 30किलो चॉद तारा तांदुळ, 45 किलो तेल, रोख रक्कम 5,000₹ व ब्रेकर मशीन असा एकुण 1,26,300₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- इंदुमती भालेराव यांनी दि.11.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-तस्लीम गणी काझी, वय 57 वर्षे, रा. रामनगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची मोटरसायकल एचएफ डिलक्स कंपनी क्र एमएच 25 एबी 1272 जिचा इंजिन नं-HA11 EFE9F 27777, चेसी नं- MBLHA11AEE9F12111ही दि.02.05.2024 रोजी 10.00 ते 10.15 वा. सु.नगर पालीकेच्या बाजूस हॉटेल सनरिच समोर धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- तस्लीम काझी यांनी दि.11.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे : दि. 12.04.2024 रोजी 17.30 वा. सु. ते दि. 14.04.224 रोजी 02.47 वा. सु. सांगवी मार्डी शिवारातील जिओ कंपनीचे टॉवर मधील 60 मिटर लांबीचे 6 आर आर एच केबल व 02 सिप्श्रि केबल असा एकुण 5,000₹ किंमतीचे केबल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-आण्णासाहेब जगन्नाथ कोळेकर, वय 40 वर्षे, रा.नरुटेवाडी ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर यांनी दि.11.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-कैलास दशरथ जाधव, वय 32 वर्ष्ज्ञे, रा. युसुफवडगाव ता. केज ह.मु. परळी बायपास रोड कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची पॅशन प्रो मोटरसायकल क्र एमएच 44 क्यु 0289 व इंजिन नं MA10EvgHH46575 व चेसी नं- MBLHA1BSGHH39638 ही दि. 25.04.2024 रोजी 22.00 ते दि. 26.05.2024 रोजी 03.00 वा. सु. कैलास यांचे राहाते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-कैलास जाधव यांनी दि.11.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ फसवणुक.”
उमरगा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)ऋशमंत रामकृष्ण रेड्डी, वय 25 वर्षे, रा. 2-64 नसीदुपुरम करोज राज्य आंध्रप्रदेश 518502 ह.मु. येलो कॅफेच्या पाठीमागे महाकाली अपार्टमेंट बालाजी नगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव, 2) संगा मोबाईल क्र 7028581699 यांनी दि.नोव्हेंबर 2023 ते दि. 06.05.2024 रोजी त्याचे मोबाईल द्वारे व ऑनलाईन द्वारे उमरगा येथुन वेगवेगळे सिम कार्ड वापरुन आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यातील विविध मोबाईल धारकांना फोन करुन समोरील ॲटो रिक्षा, रॅपीडो बुकींग, ओला, उबेर बुकींग इत्यादी बुकींगच्या बहाण्याने, मेडीकल यमरजन्सी, असल्याचे सांगुन क्यु आर कोड पाठवून आणेक लोकांची ऑनलाईन फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुरेश बापुराव कासुळे सहा. पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण रा.जुना उपळा रोड शिवनारायण चौक धाराशिव यांनी दि.11.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 420, 34 भा.दं.वि.सं. सह कलम 66 (सी), 66(डी) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मारहाण.”
ढोकी पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)मनोज दत्तु मने, 2) अक्षय दत्तु माने, 3) दत्तु दादाराव माने, 4) जालिंदर उत्तम माने, 5) खंडु शंकर माने, 6) रवि हरिचंद्र माने, सर्व रा. पानवाडी, 7) प्रतिक पडवळ रा. रुईभर, 8) विमल मनोज माने, 9) रत्नमाला दत्तु माने दोघे रा. पानवाडी ता. जि. धाराशिव यांनी दि. 10.05.2024 रोजी 19.30 वा. सु. पानवाडी येथे फिर्यादी नामे-गणेश रंगनाथ मोरे, वय 34 वर्षे, रा. पानवाडी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने जागेच्या वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गणेश मोरे यांनी दि.11.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506,143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
ढोकी पोलीस ठाणे : मयत नामे- विजय बाबासाहेब कसबे, वय 24 वर्षे, व सोबत फिर्यादी नामे- बुबासाहेब काशिनाथ कसबे, वय 30 वर्षे, दोघे रा. रुई ढोकी ता. जि. धाराशिव हे दोघे दि.20.04.2024 रोजी 14.00 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 25 एव्ही 9536 वर बसुन तडवळा येथे जात होते. दरम्यान रेल्वे कॉर्नर वरुन वळून धाराशिव रोडने रुईकडे जात असताना हॉटेल शिवशक्ती जवळ एका पांढऱ्या रंगाच्या इंडीका गाडीने चे चालकाने बुबासाहेब कसबे यांचे मोटर सायकलला कट मारल्यामुळे मोटरसायकलचा तोल जावून मोटरसायकल घसरुन पडल्याने मोटरसायकलवर पाठीमागे बसलेले विजय कसबे हे गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बुबासाहेब कसबे यांनी दि.11.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304(अ) सह 184, 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी