August 9, 2025

अटल आनंदवन घनवन योजनेअंतर्गत वृक्षलागवड उद्घाटन

  • डिकसळ – राज्यातील हवामान स्थानिक परिस्थिती पावसाचे प्रमाण पाण्याची उपलब्धता इत्यादी बाबी लक्षात घेऊन व त्यास अनुसरून अटल आनंदवन घनवन प्रकल्प राज्यात राबविला जात आहे.उपलब्ध कमी क्षेत्रामध्ये जास्त वृक्षांचे आणि घनवन निर्माण करण्याचा प्रयोग डिकसळ परिसर,शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे सामाजिक वनीकरण विभाग धाराशिव,परिक्षेत्र सामाजिक वनीकरण विभाग कळंब आणि शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब यांच्या संयुक्त विद्यामाने बारा हजार रोपसंख्या ४० आर इतक्या क्षेत्रात विविध वृक्षांची लागवड केली आहे आणि रोपवनास जैविक पदार्थ,सेंद्रिय खते, पाणी अशा पूरक संसाधनाची जोड देऊन, कमी कालावधीत रोपांची चांगली व जलदवाढ साधणे ,जिवंत रोपांची टक्केवारी जास्तीत जास्त राखून प्रदूषणा प्रदूषणावर नियंत्रण करणे हे या योजनेचे उद्देश आहेत ,या प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून विभागीय वनाधिकारी विश्वास करे हे उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी” वनसंवर्धन काळाची गरज” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रत्येकाने अधिकाधिक जनजागृती करून वृक्ष लागवड करणे. त्यांचे संरक्षण करणे असे संकल्प केले पाहिजे , यावेळी ते बोलताना म्हणाले की,दिवसेंदिवस वाढणारे शहरीकरण, औदयोगिकीकरण, लोकसंख्या विस्फोट, वाढती मानवी गरजा,रेल्वे मार्ग,नवीन रस्ते महामार्ग विकास,शेतीसाठी वनक्षेत्रावरील अतिक्रमणे आणि इतर काही विकास प्रकल्पामुळे वनसंपदेचा ऱ्हास होत आहे. विकासाच्या नावावर मोठया प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे.त्याचा परिणाम पर्यावरणावर होऊन आज अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे.तापमानाची समस्या, प्राण्यांच्या अनेक जाती व उपजाती पशू-पक्षी नष्ट होण्याच्या धोका निर्माण झाला आहे.पावसाचे प्रमाण कमी झाले. ऐनवेळी पाऊस, दुष्काळाचे प्रमाण वाढले, हवेचे प्रदूषण,हिमनद्या विरघळत आहेत,समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे, वाढती जमिनीची धूप या संकटांना आपणच आमंत्रण देत आहोत.आजच्या काळात पर्यावरण समतोल राखायचा असेल तर वृक्ष लागवड आणि वनसंवर्धन करून पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे. तापमान वाढ व पर्यावरणाच्या समतोल राखण्यासाठी एकूण भूभागापैकी 33 टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक आहे. धरतीमातेने मानवाला दिलेली मौल्यवान खजिना म्हणजे वनसंपदा. वनामुळे जमिनीची धूप रोखली जाते, पावसाचे पडलेले पाणी अडवणूक होऊन जमिनीत मुरते, पूर-दुष्काळ यासारख्या आपत्ती रोखण्यात मदत होते, पालापाचोळयाची भर टाकून जमिनीचा कस वाढविते, मानवाला ऑक्सिजनचा पुरवठा करून कार्बनडाय-ऑक्साईडचा नाश करते, वनापासून फुले-फळे, औषधे, थंडगार सावली, जनावरांसाठी चारा, मसाले, जळणासाठी, निरनिराळ्या वस्तू बनविण्यासाठी, घरे बांधण्यासाठी लाकूड मिळते. दरवर्षी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा उपक्रम राबविला जातो. प्रत्येकवर्षी जी झाडे लावली जातात.
    ती जगविण्यासाठी अधिक प्रयत्न झाला पाहिजे. नाहीतर, त्याच खड्डात पुन्हा वृक्षारोपण केले जातात. “जैसे थे स्थिती” न करता मुलांप्रमाणे झाडांची ही काळजी घेणे आवश्यक आहे. स्वतःला वाचविण्यासाठी, भावीपिढीसाठी व समतोल पर्यावरणासाठी झाडे लावणे आणि वनसंवर्धन करणे खूप गरजेचे आहे. आपली धरतीमाता सदाहरित ठेवण्यासाठी या वनसंवर्धन करण्याचा संकल्प करूया.असे आवाहन त्यांनी केले.त्या निमित्ताने
    स्पर्धा परीक्षा आणि व्यक्तिमत्व विकास आणि वनाऔषधीचे जतन व संवर्धन या विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले त्यासाठी भाग्यश्री वटारे व डॉ. प्रवीण बनमेरू हे उपस्थित होते.प्राचार्य डॉ. सुनील पवार अध्यक्षस्थानी होते , अटल आनंदवन व घनवन हा प्रकल्प राबवण्यासाठी वृक्षलागवडसाठी सहकार्य करणाऱ्या सामाजिक वनीकरण विभाग धाराशिव व परिक्षेत्र सामाजिक वन विभाग कळंब कर्मचारी यांचाही गौरव केला. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती मध्ये संस्थेचे संस्थेचे सचिव डॉ.अशोक मोहेकर यांनी महाविद्यालयाची जागा वृक्ष लागवडीसाठी दिली त्याबद्दल आभार व्यक्त केले तसेच उदघाटक विश्वास करे विभागीय वन अधिकारी धाराशिव, श्रीमती भाग्यश्री वटारे( मास्टर ट्रेनर पुणे) व संतोष दोडके (परिक्षेत्र वनविभाग ) धाराशिव हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.श्रीकांत भोसले,प्रा.अर्चना मुखेडकर (वनस्पतीशास्त्र विभाग) व संतोष दोडके (परीक्षेत्र वन विभाग) यांनी केले,संचालन डॉ.दत्ता साकोळे,प्रास्ताविक प्रा.अर्चना मुखेडकर तर आभार डॉ.खोब्राजी पावडे यांनी मानले, यावेळी उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान, डॉ.सतीश लोमटे ,डॉ ज्ञानेश चिंते,डॉ.राठोड, डॉ.ताटी पामुल,ग्रंथपाल अनिल फाटक, डॉ.साठे, डॉ .महाजन, डॉ .चादर, डॉ. मानेकर, डॉ. चंदनशिवे ,प्रा.शाहरुख, प्रा.शिंपले,प्रा.टिपरसे मॅडम,हे उपस्थित होते.यात 150 विद्यार्थ्यांनि सहभाग नोंदवला होता.
error: Content is protected !!