कळंब (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – तालुक्यातील मौ. हसेगाव के.येथे दि.०२ मे २०२४ रोजी पर्याय संस्थे शेजारी पर्याय सामाजिक संस्थचे कार्यवाह आणि महाराष्ट्र लोकविकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांनी आपली मुलगी डॉ. हर्षदा आणि वाईचे प्रा.भिमराव पटकुरे यांचे चिरंजीव इंजि.अक्षय यांचा विवाह सर्व धर्मातील धर्म गुरूंच्या उपस्थितीमध्ये भारतीय संविधानाचे पूजन,सर्व धर्मातील थोर पुरुषांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विविध सर्व धर्म, जाती पंथ,भाषा असलेल्या लोकांनी एकत्र येऊन वधू वरास आशीर्वाद देऊन हा विवाह सोहळा साजरा करण्यात आला, सुमारे सहा हजार लोकांनी राष्ट्रगीत गायले आणि भारत माता कि जय अशा घोषणा दिल्या, संपूर्ण भारत देशातील हा पहिलाच यशस्वी प्रयोग आहे. यावेळी विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांनी आपल्या कन्येस लिहलेल्या पत्राचे वाचन सूत्रसंचालक भैरवनाथ कानडे यांनी केले.त्यानंतर प्रसिद्ध गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांनी सामाजिक आशय असलेल्या संगीतमय मंगलाषटका म्हणल्या नंतर पुष्परूपी अक्षदा टाकण्यात आल्या,आकाशात शोभेच्या दारूची आतिषबाजी करण्यात आली.
या प्रसंगी सा.साक्षी पावनज्योतचा अंक सर्वधर्म सन्मान विशेषांकाचे उपस्थित नागरिकांना देण्यात आला. सर्व धर्म गुरूंचे स्वागत आणि सत्कार यावेळी विश्वनाथ(अण्णा) तोडकर, प्रा. भिमराव पटकुरे, वैजिनाथ तोडकर आणि त्यांच्या सर्व कुटुंबीयांनी केला.प्रातिनिधिक स्वरुपात श्रीक्षेत्र मन्मथ स्वामी धाम संस्थान चे डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांनी मार्गदर्शन करून आशीर्वाद दिले. या वेळी त्यांनी मानवाचे कल्याण हाच सर्व धर्माचा उद्देश असल्याचे सांगितले तसेच शिवधर्म पीठाचे शिवाचार्य ज्ञानेश्वर अंभोरे गुरुजी मातृ तीर्थ सिंधखेडराजा, हरमन सिंग खोसाला नांदेड गुरूव्दारा, प्रकाश महाराज बोधले महाराज राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी सांप्रदाय, आर्य समाज धर्मगुरू विज्ञानमुनी,फादर दिवाकर रेवरेंट चर्च आफ नोर्थ इंडीया,भंते सुमेध नागसेन बुद्ध लेणी खरोसा, हाफीज मोहम्मद अली चिश्ती कळंब, सत्यशोधक विधी प्रसारक मच्छिंद्रजी गवाले नांदेड यांनी वधू वरास आशीर्वाद दिले. दरम्यान दि.०२ मे रोजी दुपारी या विवाह सोहळ्यासाठी उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे उमदेवार मा.खासदार ओमराजे निंबाळकर यांनी हि उपस्थिती दर्शवून वधू वरास आशीर्वाद दिले.
या सर्व धर्म सन्मान विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्थाचे संस्था प्रमुख, प्रशासनातील प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत यांच्यासह महिला बचत गट सदस्य, शेतकरी वर्ग,गायरान चळवळीतील कार्यकर्ते आणि गायरान धारक, यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील जन्मुदाय उपस्थित होता, स्टेज आणि स्टेज अरेंजमेंट जेवण व्यवस्था यासाठी पंजाब राऊत आणि सचिन तोडकर यांच्या टीमने विशेष मेहनत घेतली.पर्याय संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीतून हा विवाह सोहळा दिमाखदारपणे संपन्न झाला.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन