कळंब (बालाजी बारगुले ) – तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळकरंजा या शाळेने नुकत्याच झालेल्या मंथन एमटीएस परीक्षेमध्ये चांगले यश मिळवलेले आहे. शाळेची इयत्ता पहिली ची विद्यार्थिनी कुमारी शरण्या जीवनसिंह ठाकूर हिने १२४ गुण घेत केंद्रात प्रथम, जिल्ह्यात नववा, तर राज्यात चौदाव्या क्रमांक पटकावला . इयत्ता दुसरीत शिकत असलेल्या हिंदवी आत्माराम माने हिने 128 गुण घेत केंद्रातून प्रथम जिल्ह्यातून सातवा तर राज्यात बाराव्या क्रमांकाचे उत्तीर्ण झालेली आहे. इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी कुमारी आर्या विजय शिंदे हिने 182 गुण घेत केंद्रातून द्वितीय येण्याचा मान पटकावला असून इयत्ता पाचवी शिकत असलेल्या वीर सिंह जीवन सिंह ठाकुर याने 234 गुण घेऊन केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे.या यशाबाबत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा उपसरपंच श्री शरद गालट,गावचे सरपंच तथा प्रथम नागरिक विजय व्यंकटराव शिंदे,शाळेचे मुख्याध्यापक संतोष भोजने, बीटचे विस्तार अधिकारी फुलारी, गटशिक्षणाधिकारी धर्मराज काळमाते यांनी अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शाळेतील सहशिक्षक हनुमंत घाडगे,श्रीमती भारती सूर्यवंशी व श्रीमती समीना बागवान यांनी कष्ट घेतले.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन