कळंब (अविनाश घोडके) – जिल्ह्यातील शेतकरी मतदार राजा ऊस बीलासाठी कारखान्यावर चकरा मारण्यात बेजार झाला असला तरी कारखानदार मात्र निवडणुकीत मशगुल झाला असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मुला- मुलीची लग्ने, घर बांधकामासह इतर स्वप्ने धुळीस मिळत आहेत. जानेवारीत गेलेल्या उसाची बिले एप्रिल संपत आला तरी अजून पर्यंत न मिळाल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतातूर झाला आहे. शरद पवार राष्ट्रवादीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर मात्र एकटेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या या समस्येवर साखर आयुक्त्याकडे मागणी लावून धरत असल्याचे दिसत आहे. निवडणुकीच्या तोंडावर कारखानदार पुढाऱ्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बीले तात्काळ देणे गरजेचे आहे. अन्यथा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मताला मुकावे लागेल याचे भान कारखानदार पुढाऱ्यांनी ठेवावे अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले