August 9, 2025

पार्थ वाघमारे शालेय राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी रवाना

  • कळंब – सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंब येथील इयत्ता ११वी मधील पार्थ सुरेश वाघमारे हा शालेय राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी रवाना झाला. दि.१९/४/२०२४ पासून सातारा येथील नेटबॉल शिबिरात सहभागी होऊन महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.दि.२७ एप्रिल २०२४पासून हरियाणा येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्याला क्रीडा शिक्षक उत्तरेश्वर गायकवाड,परमेश्वर मोरे, उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी शिंदे,श्रीमती प्रतिभा रामचंद्र गांगर्डे (स्काऊट-गाईड कॅप्टन) यांचे मार्गदर्शन लाभले.
    पुढील स्पर्धेसाठी त्याला जिल्हा क्रीडा अधिकारी हरनाळे, नाईकवाडे,शाळेचे मुख्याध्यापक जाफर पठाण, पर्यवेक्षक मुंढे, उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी शिंदे तसेच ज्यूनिअर काॅलेजचे सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका, शाळेचे सर्व शिक्षक -शिक्षिका, शालेय कर्मचारी,समर्थ शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुलभा शिंदे, माजी प्राचार्य व प्रियदर्शनी बॅकेचे चेअरमन श्रीधर भवर, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ‌देवानंद साखरे, डॉ. ‌बाळकृष्ण भवर, स्काऊट-गाईड कॅप्टन श्रीमती प्रतिभा रामचंद्र गांगर्डे , क्रांती ज्योती महिला बचतगटांच्या अध्यक्षा,सचिव, सर्व सदस्यां,पत्रकार विलास मुळिक यांनी पार्थ वाघमारे व सर्व क्रीडा मार्गदर्शक यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!