August 9, 2025

फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने भारताच्या महानायकाला अभिवादन

  • धाराशिव – भारताचे महानायक,विश्वरत्न,बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती महा उत्सवात फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
    जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आकर्षक अशा बुध्द गुफा देखाव्यास भेट देऊन तथागतास वंदन केले.धनंजय वाघमारे यांनी सामुदायिक बुध्द वंदना घेतली तर संजय गजधने यांनी प्रस्तावना केली.समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना गणेश रानबा वाघमारे यांनी दिली.
    महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र हाल अपेष्टा सोसुन आपल्याला अधिकार दिलेत, त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे,शिक्षण घेतले पाहिजे असे मनोगत जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केले तर शालेय साहित्य वाटप करतांना एका विद्यार्थ्याने सांगितले की तिचे वडील दारु पितात यावरती अतुल कुलकर्णी यांनी तिच्या वडीलाची माहिती घेण्यास सोबतच्या पोलीस अधिकारी यांना सुचना दिली.
    यावेळी समाज कल्याण सहा.आयुक्त बाबासाहेब अरवत,बिल गेट्स काॅलेजचे प्राचार्य सोमनाथ लांडगे,विनय सारंग,आमदार राणा जगजीतसिंह पाटील, आमदार कैलास पाटील,माजी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,विश्वास शिंदे, नितीन काळे, युवराज नळे,राजाभाऊ शेरखाने,महेबुब पटेल,रवि कोरे,राजसिंहा निंबाळकर,अग्निवेश शिंदे प्रशांत पाटील,उमेश राजेनिंबाळकर,सिध्दार्थ बनसोडे,राणा बनसोडे,दत्ता पेठे,बापु पवार,नवज्योत शिंगाडे,यासह अनेक मान्यवरांनी अभिवादन केले.रक्तदान,भोजन दान आणि मान्यवरांचे सत्कार तर आकर्षक अशा बुध्द गुफा देखावा अशा अनेक सामाजिक उपक्रमातुन महामानवास अभिवादन करण्यात आले.समितीच्या उपक्रमात राजगीर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने निराधार अशा शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.संजय सरवदे यांच्यातर्फे दरवर्षी प्रमाणे थंड जारचे पाणी व्यवस्था,बुध्दभुषण डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समारोह समिती धाराशिवच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र प्रदर्शन,नगर परिषदेच्या वतीने चार दिवस चालणाऱ्या जयंती महा उत्सवात पाण्याची सोय करण्यात आली होती.आकर्षक अशा बुध्द गुफा देखाव्यास पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली,समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन महामानवांची जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केली.फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीचे पदाधिकारी अंकुश उबाळे,बंन्शी कुचेकर, धनंजय वाघमारे,बाबासाहेब वाळा बनसोडे,गणेश रानबा वाघमारे,संजय गजधने,प्रविण जगताप,बलभीम कांबळे, संपतराव शिंदे,रमेश कांबळे,स्वराज जानराव, विशाल घरबुडवे,राहुल राऊत,तर दिनकर रोकडे,किसन घरबुडवे,सतिश भालेराव,बाबा गुळीग,दिपक पांढरे व इतर उपस्थित होते.जिल्हा प्रशासन,पोलीस प्रशासन,पत्रकार बांधव,नगर परिषद,जिल्हा परिषद सह स्वयंपाक करणारी आचारी मंडळी व इतरांचे समितीच्या वतीने गणेश रानबा वाघमारे यांनी आभार मानले.
error: Content is protected !!