धाराशिव – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त बहुजन विद्यार्थी व सामाजिक संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन म्हणुन एक वही एक पेनचे आवाहन प्रत्येक वर्षी केले जाते.दर वर्षी प्रमाणे याही वर्षी आशाताई कांबळे सामाजिक कार्यकर्त्या यांनी 5 डझन 200 पानी वही आणि 100 पेन असे शालेय साहित्य धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे आणि त्यांच्या कन्या ईशाणी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांच्या हस्ते संघटनेचे अध्यक्ष स्वराज जानराव व सदस्य बाबासाहेब बनसोडे यांच्या कडे दिले.या आवाहना मागील उद्देश असा की,पोटाची खळगी भरता भरता जीव मेता कुटीला आलेल्या आई – बापांना मुलांच्या शिक्षणाचा भार पेलने अशक्य होऊन जाते. मुलांच्या शालेय साहित्या साठी महागाईच्या काळात लोकांचे कर्ज काढुन शिक्षण शिकविणाऱ्या गरीब आई बापाच्या तसेच जे एकल पालक अथवा अनाथ असलेल्या गरजु मुलांना देऊन त्यांच्या वरील आर्थिक भार कमी करणे हा असतो,आपली छोटी मदत पुरी पडत नसेल परंतु गरजुंना आर्थिक खर्चास हातभार लागु शकतो हे नक्की.या अभियानात अनेक भीम अनुयायी सहभागी होऊन आपापल्या परीने वही व पेन देऊन महामानवास अभिवादन करण्यात आले.यावेळी अर्चनाताई मस्के,धनंजय शिंगाडे,कमलाकर बनसोडे इतर उपस्थित होते.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी