August 9, 2025

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

  • कळंब -शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य पठाण जे. एन. यांच्या हस्ते कायदेपंडित बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयाचे पर्यवेक्षक काकासाहेब मुंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख परमेश्वर मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर तोडकर यांनी मानले. यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!