August 9, 2025

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फळवाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न

  • वसमत – उपजिल्हा रूग्णालय येथे दि.१४ एप्रिल २०२४ रोजी सावली प्रतिष्ठान कन्हेरगावच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष कमल पवार व सचिव दिनाजी बुजवणे यांनी केले होते.
    या प्रसंगी डॉ.गजानन चव्हाण यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद भूषवीले तर प्रमुख उपस्थीतीत इंजी.एम.ए.मुरक्या,परिचारिका मिराताई टाले,भोसले ,अभिषेक वाघ, तेलंग, माधव मोरे ,नामदेव कांबळे, विश्वनाथ मिरासे , सय्यद जाकेर , शेख याकुब, शेख नसीर, भारत बळवंते ,राजु उबाळे, मुरली दळवी, बालाजी अन्नपूर्णे, समर्थ मिरासे, लक्ष्मण गायकवाड ,पेंटर ताटेवाड, अजय गजभार, संभाजी देशमाने , सुनिल सावंत, सागर बळवंते, संदिप गायकवाड, देवानंद बसवंते ,प्रकाश विनकर, अदि मान्यवर उपस्थीत होते.
    उप जिल्हा रुग्णालयातील ४० ते ५० रूग्णांना फळ वाटप करून महामानव घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. अठरा पगड जातीतील समाजाला ,कामगार ,महीलांना सविंधानात मुलभुत अधिकारा बाबत तरतुदी करून सर्वांना न्याय देणारे व्यक्तीमत्व म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.व महामानवाचे कार्य एका जाती पुरते नसते असे मत डॉ.चव्हाण यांनी व्यक्त केले.
    कार्यक्रम यशस्वी ते करिता प्रविण कांबळे,हर्षद खरे,रामभाऊ टाकणखार यांनी परिश्रम घेतले .
error: Content is protected !!