August 9, 2025

वाहतुकीचे नियम तोडून पळवाट काढणाऱ्याची उडाली झोप

  • धाराशिव (जयनारायण दरक) –
  • वाहतुकीचे नियम धाब्यावर ठेवणाऱ्यांना काय माहित की,त्यांच्या वाहनावर किती चा दंड बसलेला आहे,कालांतराने त्यांना दंडाचा संदेश त्यांच्या भ्रमणध्वनी वर येतो आणि नियम मोडल्या चा पश्र्चाताप होतो.शहरामध्ये गेल्या (१जाने.२०२४ते ३१ मार्च २०२४) ६१८ केसेस
    तीन लाख २१ हजार ७५० रुपये व आज १०/०४/२४ रोजी २२ केसेस, १५०००/-एव्हढा दंड कळंब पोलिसांनी विविध वाहनावर केलेला आहे. परंतु वाहन धारकांना एक दिवस का होईना तो दंड भरावा लागणार आहे.
    वाहतुकीचे नियम तोडून पळवाट काढणे आता सोपे राहिलेले नाही, अशा वाहन धारकावर ई चलणाद्वरे दंड जागेवर केला जातो. यापूर्वी नियम मोडणाऱ्या मंडळींचा पाठलाग पोलीस करत असतं आणि त्यांना चांगलाच धडा शिकवत असत परंतु आता थेट जागेवर ई चलणाद्वरे दंड आकारण्यात येत आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या मंडळींना जागेवर दंड करण्यासाठी वन स्ट्राइक वन मेमो याप्रणाली द्वारे सहज शक्य झाले आहे.
  • राज्यात कोणत्याही ठिकाणी कोणत्याही रस्त्यावर वाहन धारकांनी नियम मोडल्या वर या नवीन प्रणाली द्वारे भ्रमण ध्वनी वर संदेश रप्त होत आहे. आतापर्यंत त्याने किती वेळा नियमाची पायमल्ली केली आहे हे सर्व रेकॉर्ड वाहन धारकला कळून येते. त्यामुळे नियमावली तुडवनाऱ्यावर चांगलाच वचक बसत आहे.
  • वाहतुकीचे नियम धाब्यावर ठेवणाऱ्या चालकावर नियंत्रण ठेवण्यासाठी कळंब सारख्या ठिकाणी दोन वाहतूक पोलीस व दोन ई चलन मशीन कार्यान्वित आहेत. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज चौक, धाराशिव जिल्ह्याची हद्द ज्या ठिकाणी सुरू होते ते म्हणजे द्वारका नगरी जवळील स्थळ, पोलीस स्टेशन रस्ता व डिकसळ रोड वर असलेल्या वाहतूक पोलिसांकडून अशा प्रकारच्या कारवाई करण्यात येत असत.
    नोव्हेंबर २०२३ मध्ये २५९ केसेस करून एक लाख ३४ हजार, डिसेंबर मध्ये २३२ केसेस करून एक लाख पाच हजार ८०० तर जानेवारी २४ च्या शेवटापर्यंत २३४ केसेस करून एक लाख तीस हजार ५०० रुपये एव्हढा दंड विविध वाहन प्रकार व विनापरवाना वाहन चालवणे, सीट बेल्ट न लावणे, दुचाकी वरून तिघांनी स्वार होणे, दुचाकी चालवत असताना भ्रमणध्वनी वर बोलणे अशा विविध कारणांमुळे ई चलणाद्वरे दंड आकारण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रवी सानप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राम बहुरे साहेबासोबत पोलीस अंमलदार वाहतूक पोलीस म्हणून रवी कोरे व महादेव मुंडे हे दोघे कामकाज पाहत आहेत.
  • *वाहन धारकांनी आपले वाहन चालवत असताना दुसऱ्यांना त्रास होणार नाही, शिवाय वाहतुकीचे नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर अनाठायी होणारा ऑनलाईन दंड टळेल. त्यामुळे प्रत्येकाने नियमाचे पालन करावे. मागील वर्ष २०२३ मध्ये साडेतीन हजार केसेस करून जवळपास साडेअठरा लाख रुपयाचे दंड तर १जाने.२०२४ते ३१ मार्च २०२४ वर्षात ६१८ केसेस करून ३,२१,७५०/- दंड नेमलेल्या वाहतूक पोलिसांच्या वतीने ई चलणाद्वरे करण्यात आला आहे. – रवी सानप,पोलीस निरीक्षक कळंब
error: Content is protected !!