August 9, 2025

संत ज्ञानेश्वर बालकाश्रम येथे वृक्ष पूजनकरून हवामान दिन साजरा

  • कळंब (महेश फाटक ) – वन सप्ताह व दि. 23 मार्च जागतिक हवामान निमित्त वृक्ष पूजनाचा कार्यक्रम संत ज्ञानेश्वर बालकाश्रम कळंब येथे घेण्यात आला याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी वन सप्ताह व हवामान दिनाच्या निमित्ताने वनसंरक्षण व संवर्धन व नवीन वृक्ष लागवड व्हावी असे विचार व्यक्त केले व आज पृथ्वीवर मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे सर्व प्राणी मात्रानां शुद्ध हवा मिळाली पाहिजे यासाठी वृक्षतोड थांबली पाहिजे व नवीन वृक्षांची लागवड संवर्धन व्हावे यामुळे प्राणीमात्राच्या आरोग्यास जीवसृष्टीस व प्रदूषित हवामानामुळे जे संकट निर्माण झाले आहे यावर मात करता येईल असा संदेश देण्यात आला याप्रसंगी ह. भ. प .महादेव महाराज अडसूळ ,सुनिता देवी आडसूळ ,ज्येष्ठ विधिज्ञ त्र्यंबकराव मनगिरे, समाजसेवक सुफी शमशुद्दीन सय्यद ,प्राचार्य महादेव गपाट, बंडू आबा ताटे ,माधवसिंग राजपूत ,प्रदीप यादव, किशोर वाघमारे यांच्यासह आश्रमातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!